IN PICS : 5 वर्षांपासून एकही सिनेमा नाही, तरीही पती करणपेक्षा 7 पट श्रीमंत आहे बिपाशा बासू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 02:58 PM2021-01-07T14:58:57+5:302021-01-07T15:07:19+5:30

बिपाशा बासूचा आज वाढदिवस. बिप्स आज 41 वर्षाची झाली.

बिपाशा बासूचा आज वाढदिवस. बिप्स आज 41 वर्षाची झाली. 5 वर्षांपूर्वी बिपाशा ‘अलोन’ या सिनेमात दिसली होती. 2015 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमानंतर बिपाशा एकाही सिनेमात दिसली नाही. पण संपत्ती म्हणाल तर पती करण सिंग गोव्हरपेक्षा तिच्याकडे सातपट संपत्ती आहे.

इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, बिपाशाकडे पतीपेक्षा 7 पट अधिक प्रॉपर्टी आहे. 2020 मध्ये तिची नेटवर्थ प्रॉपर्टी सुमारे 109 कोटी रूपये आहे.

बिपाशाच्या पतीचे अर्थात करणची प्रॉपर्टी किती तर त्याच्याकडे 14.16 कोटींची एकूण संपत्ती आहे.

बिपाशाकडे सिनेमे नाहीत, पाच वर्षांपासून एकही सिनेमा रिलीज झालेला नाही. मात्र तिच्याकडे अनेक मल्टी नॅशनल कंपन्यांच्या जाहिराती आहेत. यातून ती बराच पैसा कमावते.

बिपाशा फिटनेसची दिवानी आहे. त्यामुळे रिबॉक, एरिस्ट्रोकेट लगेज, कॅडिला शूगर फ्रि अशा अनेक मोठ्या बॅ्रंडच्या जाहिराती तिने केल्या आहेत.

बिपाशा अनेक स्टेज शो करते. एका शोसाठी ती सुमारे 2 कोटी रूपये चार्ज करते.

बिपाशाला ब्लॅक ब्युटी म्हणतात. 40 पेक्षा अधिक मॅगझिनच्या कव्हरपेजवर ती झळकली आहे.

बिपाशाकडे मुंबईत दोन घर आहेत. कोलकात्यातही तिचे एक घर आहे. याची किंमत कोट्यावधी रूपयांच्या घरात आहे.

लक्झरी गाड्यांबद्दल म्हणायचे तर ऑडी 7, पोर्शे, फॉक्सवॅगन बीटल अशा अलिशान गाड्या तिच्याकडे आहेत.

आज बिपाशाकडे सिनेमांच्या ऑफर नाहीत. पण एकेकाळी ती बॉलिवूडच्या टॉपमोस्ट अभिनेत्रींपैकी एक होती. एका सिनेमासाठी ती त्यावेळी 2 ते 3 कोटी रूपये घ्यायची. अनेक बंगाली सिनेमातही तिने काम केले आहे.