'या' भोजपुरी अभिनेत्रींच्या बोल्डनेसपुढे बॉलिवूड ॲक्ट्रेसही आहेत फिक्या; टॉपलेस फोटोशूटमुळे आल्यात चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 04:56 PM2022-05-18T16:56:30+5:302022-05-18T17:00:38+5:30

Bhojpuri actress: गेल्या काही काळात बॉलिवूडसह भोजपुरी कलाविश्वातील कलाकारही सातत्याने चर्चेत येत आहेत.

गेल्या काही काळात बॉलिवूडसह भोजपुरी कलाविश्वातील कलाकारही सातत्याने चर्चेत येत आहेत. यामध्येच सध्या काही भोजपुरी अभिनेत्री चर्चेत आल्या असून त्या बोल्डनेसच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत असल्याचं पाहायला मिळतं. म्हणूनच, या अभिनेत्री कोणत्या ते पाहुयात.

रानी चटर्जी - भोजपुरी कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे रानी चटर्जी. अनेकदा रानीदेखील तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत येते.

सोनिका गौड़ा - मध्यंतरी सोनिका तिच्या बोल्ड फोटोमुळे चांगलीच चर्चेत आली होती. अलिकडेच तिने एक बोल्ड फोटोशूट केलं असून तिचे हे फोटो प्रचंड मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते.

मोनालिसा - भोजपुरी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मोनालिसा. उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणाऱ्या मोनालिसाने अनेकदा टॉपलेस फोटोशूट करुन नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

संचिता बनर्जी- संचिताने भोजपुरीसह अन्य अनेक भाषिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. संचितादेखील चांगलीच बोल्ड अभिनेत्री आहे.

सोना बत्रा - बोल्ड फोटो शेअर करत कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे सोना बत्रा. सोना तिच्या चित्रपटांपेक्षा बोल्ड फोटोमुळे चर्चेत येते.

नम्रता मल्ला - भोजपुरी कलाविश्वातील बोल्ड अभिनेत्रींमध्ये नम्रता मल्लाचं आवर्जुन नाव घेतलं जातं. सोशल मीडियावर सक्रीय असलेली नम्रता कायम तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.

सुषमा अधिकारी - चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सुषमा कायम सोशल मीडियाचा वापर करत असते. अलिकडेच सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेलेल्या सुषमाने एक टॉपलेस फोटो शेअर करत खळबळ माजवली होती.

स्वीटी छाबड़ा - भोजपुरी कलाविश्वातील सर्वपरिचित चेहरा म्हणजे स्वीटी छाबडा. अभिनयाव्यतिरिक्त स्वीटीही तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते.