आपल्याच लोकांनी केले 'या' अभिनेत्रींचे खून, एकीचा तर दीड वर्षाने फार्म हाऊसवर सापडला होता सांगाडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 04:51 PM2022-01-19T16:51:00+5:302022-01-19T17:01:20+5:30

Actresses Murders : ही पहिलीच वेळ नाहीये की, आपल्याच लोकांनी आपल्या प्रिय व्यक्तीची निर्दयीपणे हत्या केली. याआधीही काही अभिनेत्रींच्या हत्येच्या घटना घडल्या आहेत. ज्यात त्यांचे जवळचे लोकच गुन्हेगार आहेत.

बांग्लादेशी अभिनेत्री राइमा इस्लाम शिमू (Raima Islam Shimu) बेपत्ता झाल्यावर दुसऱ्या दिवशीच तिचा मृतदेह पोलिसांना एका पोत्यात सापडला. याप्रकरणी पोलिसांनी तिचा पती शखावत अली नोबल याची चौकशी केली तर त्याने त्याचा गुन्हा कबूल केला. ढाका पोलिसांनी अभिनेत्रीच्या हत्येमागे कौटुंबिक कलह कारण असल्याचं सांगितलं. ही पहिलीच वेळ नाहीये की, आपल्याच लोकांनी आपल्या प्रिय व्यक्तीची निर्दयीपणे हत्या केली. याआधीही काही अभिनेत्रींच्या हत्येच्या घटना घडल्या आहेत. ज्यात त्यांचे जवळचे लोकच गुन्हेगार आहेत.

मीनाक्षी थापा - मीनाक्षी थापाच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला होता. तिच्या मित्रांनीच तिला किडनॅप करून तिचं शीर धडापासून वेगळं केलं होतं. मीनाक्षीला 'हिरोईन' सिनेमात छोटासा रोल करणारा अभिनेता अमित जयस्वाल आणि त्याची गर्लफ्रेन्ड प्रीती सुरिनने किडनॅप केलं होतं. खंडणी दिली नाही म्हणून तिची गोरखपूरमध्ये हत्या केली होती. त्यांनी मीनाक्षीचं शीर धडापासून वेगळं केलं होतं.

शशिरेखा - शशिरेखा तमिळ टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री होती. पण तिच्या प्रेमाच्या हातूनच मारली गेली. शशिरेखाचा पती रमेश शंकरचं दुसऱ्या महिलेसोबत अफेअर सुरू होतं शशिरेखा त्यांच्यात अडथळा ठरत होती. त्यामुळे या हत्याकांडाचा प्लान करण्यात आला. अभिनेक्षी शशिरेखाचं शीर तिच्या पतीने धडापासून वेगळं केलं होतं. रमेश शंकर आणि त्याची लिव-इन पार्टनरने शशिरेखाचं शीर दोन दिवस त्यांच्या बाथरूममध्ये ठेवलं होतं. नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावली.

लैला खान - अभिनेत्री लैला खानच्या मृत्यूनेही सर्वांना हैराण केलं होतं. तिची आई सेलिना पटेलने तीन लग्ने केली होती. लैला खानची आई सेलिनाकडे मुंबईत कोट्यावधी रूपयांची संपत्ती होती. एक दिवस लैला अचानक गायब झाली. लैलाच्या आईचा तिसरा पती परवेजने पैशांसाठी पूर्ण परिवाराची हत्या केली होती. हत्येचा दीड वर्षानंतर लैलाच्या परिवाराचे मृतदेह त्यांच्या फार्महाउसमध्ये सापडले होते.

प्रिया राजवंश - अभिनेत्री प्रिया राजवंशचं लाइफ एखाद्या सिनेमाच्या कथेप्रमाणेच होतं. प्रियाच्या फिल्मी करिअरची सुरूवात चांगली झाली होती. पण तिचा शेवट फारच वेदनादायी झाला. चेतन आनंदच्या दोन्ही मुलांनी प्रॉपर्टीसाठी प्रियाची हत्या केली होती. पोस्टमार्टम रिपोर्टमधून खुलासा झाला होता की, प्रियाला गळा दाबून तिला मारण्यात आलं.

कंदील बलोच - पाकिस्तानी अभिनेत्री, मॉडल आणि सोशल मीडिया सेलिब्रिटी कंदील बलोचची २०१६ मध्ये गळा दाबून हत्या करण्यात आली होती. हत्येच्या दुसऱ्या दिवशी, बलोचचा एक भाऊ मोहम्मद वसीमने पोलिसांसमोर कबूल केलं होतं की, त्यान बलोचची हत्या केली. कारण ती सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडीओत शेअर करत परिवाराचं नाव बदनाम करत होती.