कोण आहे शाल्मली खोलगडेचा नवरा फरहान शेख? जाणून घ्या त्याच्याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 11:13 AM2021-12-01T11:13:52+5:302021-12-01T11:20:03+5:30

Shalmali kholgade: अलिकडेच शाल्मलीने चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. शाल्मलीने नुकतीच तिच्या प्रियकरासोबत लग्न केलं आहे.

आपल्या सुमधूर आवाजाने कानसेनांना तृप्त करणारी लोकप्रिय गायिका म्हणजे शाल्मली खोलगडे (Shalmali Kholgade). आजवरच्या कारकिर्दीत शाल्मलीने अनेक गाण्यांना आपला आवाज दिला आहे.

शाल्मलीची 'बलम पिचकारी', 'लत लग गई' अशी अनेक गाणी सुपरहिट ठरली आहेत. त्यामुळे आज तिचा अफाट मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.

अलिकडेच शाल्मलीने चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. शाल्मलीने नुकतीच तिच्या प्रियकरासोबत लग्न केलं आहे.

२२ नोव्हेंबर रोजी शाल्मलीने लग्न केलं असून या लग्नसोहळ्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले. सोबतच अखेर लग्नबंधनात अडकल्याचं जाहीर केलं.

शाल्मलीने तिचा प्रियकर फरहान शेखसोबत लग्नगाठ बांधली आहे. विशेष म्हणजे या दोघांनी कोणताही गाजावाज न करता साध्या पद्धतीने लग्न केलं.

शाल्मलीच्या लग्नाची माहिती समोर आल्यानंतर अनेकांना तिचा प्रियकराविषयी फरहान शेखविषयी जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

सध्या सोशल मीडियावर फरहान शेख कोण हा एकच प्रश्न चर्चेत आला आहे.

शाल्मली आणि फरहान या दोघांनी जवळपास ६ वर्ष एकमेकांना डेट केलं आणि त्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला.

फरहानदेखील संगीत क्षेत्राशी निगडीत असून तो Sound Engineer आहे.