बजरंगी भाईजानमधील मुन्नी झाली १२ वर्षांची, आजही दिसते तितकीच क्यूट, पाहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 03:11 PM2020-06-04T15:11:43+5:302020-06-04T15:11:43+5:30

बजरंगी भाईजान या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेली हर्षाली मल्होत्रा नुकतीच १२ वर्षांची झाली.

सध्या भारतात लॉकडाऊन असल्याने तिने तिचा वाढदिवस अतिशय साधेपणाने घरातच साजरा केला.

हर्षालीने इन्टाग्रामवर तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.

बजरंगी भाईजान या चित्रपटात मुन्नीची भूमिका साकारणाऱ्या हर्षाली मल्होत्रीची खूप प्रशंसा झाली होती. या चित्रपटात मुन्नीच्या निरागसतेने रसिकांच्या मनाचा चांगलाच ठाव घेतला होता.

बजरंगी भाईजान या चित्रपटाआधी हर्षालीने काही मालिकांमध्ये काम केलं होते. यात 'कुबूल है', 'लौट आओ तृषा' आणि सावधान इंडिया या मालिकांचा समावेश आहे.

हर्षाली इससे पहले 'कुबूल है', 'लौट आओ त्रिशा' जैसे धारावाहिकों में भी काम किया है

बजरंगी भाईजान चित्रपटातील मुन्नीच्या भूमिकेमुळे हर्षालीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. तिला या सिनेमासाठी स्क्रीन अवॉर्डचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला होता.

हर्षालीने चित्रपट आणि मालिकांसोबतच काही जाहिरातींमध्ये देखील काम केले आहे.