'बाजीराव मस्तानी' सिनेमासाठी दीपिका नव्हती भन्साळींची पहिली पसंती,'या अभिनेत्रीचे झाले होते सिलेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 08:19 PM2021-03-16T20:19:19+5:302021-03-16T20:27:20+5:30

Not Deepika Padukone,Aishwarya Rai Bachchan was First Offered Bajirao Mastani: 'बाजीराव मस्तानी' सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाईचे रेकॉर्ड तोडले होते पण या सिनेमाच्या मुख्य भूमिकेसाठी निर्मात्यांची पहिली पसंती दीपिका नव्हती.

'हम दिल दे चुके' सिनेमानंतर घोषणा केलेल्या 'बाजीराव मस्तानी' सिनेमासाठी 2 हिरोईन्सची नावं निश्चित करण्यात आली होती.

ऐश्वर्या राय बच्चन आणि दीपिका पादुकोण या दोनपैकी कोणी एक बाजीराव मस्तानीमध्ये प्रमुख भूमिका साकारणार असल्याचं निश्चित केले गेले होते.

बाजीराव पेशवा आणि त्यांची प्रेयसी मस्तानीच्या जीवनावर हा सिनेमा होता. 2002 साली सलमान-ऐश्वर्याच्या ब्रेकअपमुळं संजय लीला भन्सालीच्या बाजीराव मस्तानी साकारण्याच्या स्वप्नाला खीळ बसली होती.

शेवटी सिनेमाच्या नावाची घोषणा करण्यात आली आणि रुपेरी पडद्यावर दीपिका पदुकोण मस्तानी म्हणून झळकली.

दीपिका पदुकोणनेही ही भूमिका तितक्याच खुबीने निभावली. या भूमिकेनेतंर तिला बॉलिवूडची मस्तानी म्हणूनच ओळखली जाऊ लागले.

ऐश्वर्यादेखील या चित्रपटांमध्ये काम करण्यास उत्सुक होती. मात्र काही कारणामुळे ऐश्वर्याने मस्तानी भूमिकेसाठी नकार कळवला.

ऐश्वर्याच्या जागी दीपिकाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता. तर बाजीराव भूमिकेसाठी रणवीर सिंहचे नाव फिक्क करण्यात आले .

भन्साळी यांना मस्तानी साकारावी तर ती ऐश्वर्यानेच अशी त्यांची इच्छा होती. पण त्यांचे स्वप्न काही ते साकार करु शकले नाही.

या सिनेमातल्या बाजीराव आणि मस्तानीमधल्या ऑनस्क्रीन रंगलेल्या रामलीलेने फॅन्सचंही मनं जिंकण्यात यश मिळवले.