वेड लावी जीवा...! अंकिता लोखंडेच्या अदांवर व्हाल फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 03:55 PM2020-02-28T15:55:32+5:302020-02-28T16:04:37+5:30

हा तुझा गोडवा वेड लावी जीवा…

अंकिता लोखंडे सध्या ‘बागी 3’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण याऊपरही सोशल मीडियावर स्वत:चे फोटो शेअर करणे ती विसरत नाही. सध्या तिच्या नव्या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातलाी आहे.

अंकिताने काही फोटो शेअर केलेत आणि या फोटोंनी चाहत्यांना जणू घायाळ केले.

या नव्या फोटोशूटमध्ये अंकिताच्या अदा वेड लावणा-या आहेत.

तिच्या चेह-यावरचे भाव, ओठांवरच्या हास्यावर चाहते फिदा आहेत.

‘बागी 3; या सिनेमात अंकिता श्रद्धा कपूरच्या बहिणीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. होय, अंकिता व विकी जैन या दोघांचा रोमान्स अगदी जोरात सुरु आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता काही काळ सिंगल होती. याचदरम्यान विकी जैन याने तिच्या आयुष्यात एन्ट्री घेतली.

अंकिता याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते.

अंकिता आणि सुशांतची भेट 2009 मध्ये पवित्र रिश्ता मालिकेवेळी झाली होती. त्यानंतर दोघेही 6 वर्ष रिलेशनमध्ये होते. पुढे 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले.