वर्षभरात तुटले होते अरिजीत सिंहचे पहिले लग्न, नंतर घटस्फोटित मैत्रिणीसोबत थाटला संसार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 03:15 PM2021-04-27T15:15:39+5:302021-04-27T15:31:53+5:30

अनेक प्रसिद्ध गाण्यांना आवाज देणारा अरिजित सिंहने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला तो ३४ वर्षांचा झाला आहे. २५ एप्रिल १९८७ रोजी जिअगंज अजीमगंज येथे त्याचा जन्म झाला.

'आशिकी-२' या सिनेमातल्या तूम ही हो गाण्यामुळेरातोरात स्टार बनलेल्या अरिजितने आतापर्यंत २०० हून अधिक गाणी गायली आहेत.

अरजित सिंह हा सध्याच्या सर्वाधिक लोकप्रिय गायकांपैकी एक म्हणून ओळखला जातो.अनेक सुपरहिट गाणी गातं रसिकांची पसंती मिळवली आहे.

अरजितनं आजवर ‘तुम ही हो’, ‘जनम जनम’, ‘अगर तुम साथ हो’, ‘हमारी अधुरी कहानी’ यांसारखी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत.

अरिजितच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. त्याने कधीच इतर सेलिब्रेटींप्रमाणे त्याची पर्सनल लाईफ समोर येऊ दिली नाही.

अरजित सिंगचे दोन लग्न झाले आहेत. पहिल लग्न फार काळ काही टिकले नाही. त्यामुळे पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर त्याने दुसरे लग्न केले.

विशेष म्हणजे त्याची दुसरी पत्नी कोयल ही त्याची बालपणीची मैत्रीण आहे.कोयलचेही अरजितसोबत हे दुसरे लग्न होते.

पहिल्या लग्नापासून तिला एक मुलगा देखील आहे. लग्नापूर्वी दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते.मात्र काही कारणामुळे दोघांनाही वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर लग्न करावे लागले.

अखेर दोघांचेही वैवाहीक आयुष्या सुरळीत नव्हते शेवटी घटस्फोट देत या दोघांनीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. कोयलच्या मुलालाही अरजितने स्विकारले. आज त्यांचा सुखी संसार सुरु आहे.

अरिजीत सिंहने फेम गुरूकुल या कार्यक्रमाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. या रिअ‍ॅलिटी शो चे विजेतेपद त्याला मिळवता आले नाही. पण या रिअ‍ॅलिटी शो नंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी त्याला चित्रपटात गाण्याची संधी दिली.

'सावरियाँ' या चित्रपटातील एक गाणे त्याने गायले होते. पण काही कारणास्तव हे प्रदर्शित झाले नाही. पण यानंतर त्याला कामे मिळत गेली. आज अरिजीतने एक गायक, संगीतकार म्हणून आपली एक ओळख निर्माण केली आहे. त्याने हिंदीप्रमाणे अनेक प्रादेशिक भाषेत देखील गाणी गायली आहेत.

Read in English