अनुष्का शेट्टीचं ठरलं! प्रभास नाही तर बिझनेसमॅनसोबत थाटणार संसार!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 06:28 PM2021-04-30T18:28:18+5:302021-04-30T18:45:43+5:30

अनुष्का शेट्टी (Anushka Shetty) लवकरच लग्न करणार असल्याचे कळतेय, चर्चा तर हीच आहे...

बाहुबली 2 या चित्रपटानंतर कधी नव्हे इतकी लोकप्रिय झालेली ‘देवसेना’ अर्थात साऊथ सुपरस्टार अनुष्का शेट्टी कितीही खुलासे करो, पण सध्या तरी तिच्या लव्हलाईफच्या चर्चा थांबायच्या नाहीत.

आधी अनुष्का व प्रभासच्या लव्ह लाईफच्या चर्चा रंगल्या. अगदी दोघेही लग्न करणार, असेही म्हटले गेले. यानंतर अलीकडे अनुष्का प्रभासला नाही तर एका क्रिकेटपटूला डेट करत असल्याची चर्चा रंगली. मग काय तर क्रिकेटपटू नाही तर अनुष्का शेट्टी एका दिग्दर्शकाच्या प्रेमात असल्याची चर्चा रंगली. पण आता ही चर्चाही अफवा सिद्ध झाली.

आता अनुष्काबद्दल एक वेगळीच माहिती कानावर येतेय. होय, अनुष्का लवकरच एका बिझनेसमॅनसोबत लग्न करणार असल्साचे कळतेय.

एका मीडिया हाऊसने दिलेल्या वृत्तानुसार, हा बिझनेसमॅन दुबईचा आहे. त्याच्या नावाचा खुलासा अद्याप झालेला नाही. पण तो अनुष्कापेक्षा वयाने लहान असल्याचे कळतेय.

अर्थात अद्याप अनुष्काने याबद्दल कुठलाही खुलासा केलेला नाही. तूर्तास तरी ती यावर काहीही बोलायला तयार नाही.

मध्यंतरी अनुष्का एका क्रिकेटपटूला डेट करत असल्याची बातमी होती. क्रिकेटपटू नॉर्थमधील असून साऊथ रणजी टीमसाठी खेळत असल्याचे म्हटले गेले होते. त्याच्या नावाचा मात्र खुलासा झाला नव्हता.

कालांतराने या नावाचा खुलासा होईल, अशी अपेक्षा असतानाच अनुष्काने या सगळ्या अफवा असल्याचे स्पष्ट केले होते. केवळ इतकेच नाही तर अशा खोट्या अफवा पेरणा-यांबद्दल संतापही व्यक्त केला होता.

त्याआधी प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्या अफेअरच्या वावड्या उठल्या होत्या. पण प्रभासने या बातम्या फेटाळून लावल्या होत्या. आम्ही केवळ चांगले मित्र आहोत, असे तो म्हणाला होता.

Read in English