PICS : अनुष्काच्या ‘सन किस्ड’ फोटोंवर विराटही फिदा, अशी केली कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 04:26 PM2021-11-26T16:26:58+5:302021-11-26T18:05:54+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा भलेही फिल्मी पडद्यापासून आहे. पण सोशल मीडियावर तितकीच अ‍ॅक्टिव्ह आहे. सध्या चर्चा आहे ती तिच्या फोटोंची.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा भलेही चित्रपटांपासून दूर आहे. पण सोशल मीडियावर तितकीच अ‍ॅक्टिव्ह आहे. सध्या चर्चा आहे ती तिच्या फोटोंची.

होय, या फोटोंमध्ये अनुष्का कोवळ्या उन्हात मस्तपैकी पोझ दिल्या आहेत. फोटो इतके सुंदर आहेत की विराटही यावर कमेंट्स देण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही.

सूर्यकिरणांमुळे अनुष्काचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे. अनुष्काच्या या फोटोंवर पती विराट कोहलीने हार्ट इमोजी शेअर केला आहे.

फोटोंमध्ये अनुष्का काळ्या रंगाच्या टॉपमध्ये दिसतेय. मोकळे केस आणि चेहºयावर खट्याळ हास्य असा तिचा अंदाज आहे.

अनुष्काचे हे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी यावर कमेंट्सची नुसती बरसात केली आहे.

काहीजण अनुष्काच्या सौंदर्याचं कौतुक करत आहेत तर काही जण विराटच्या फोटोग्राफी स्किलचं कौतुक करत आहेत.

अनुष्का सध्या आपल्या कुटुंबासोबत मुंबईत आहे आणि विराट आणि वामिकासोबत वेळ घालवतेय.

अनुष्काने अद्याप एकही नवा सिनेमा साईन केलेला नाही. पण तिच्या प्रॉडक्शन हाऊसचे अनेक प्रोजेक्ट चर्चेत आहेत. तिच्या ... या चित्रपटातून दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबील खान डेब्यू करतोय.

Read in English