PICS : प्रेग्नंट अनुष्का शर्माला ‘विराट’ आधार; क्लिनिकबाहेर दिसले कपल, पुन्हा झाले ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 03:42 PM2021-01-07T15:42:49+5:302021-01-07T16:04:00+5:30

विराट अनुष्काची इतकी काळजी घेत असलेला पाहून चाहते सुखावले. पण याचवेळी काही युजर्सनी हे फोटो पाहताच अनुष्काला ट्रोल करण्याची संधीही साधली.

अभिनेत्री अनुष्का शर्मा लवकरच आई बनणार आहेत. क्लिनिकमधील तिच्या फे-या वाढल्या आहेत. आज अनुष्का पती विराटसोबत क्लिनिकबाहेर स्पॉट झाली. यावेळी ती काहीसी अस्वस्थ दिसली.

अनुष्का अस्वस्थ दिसताच पती विराटने तिला हाताचा आधार देताना, तिची काळजी घेताना दिसला.

क्लिनिकच्या पाय-या उतरताना विराट मागून अनुष्काला पूर्णवेळ पकडून होता. तिला सांभाळत होता.

विराट अनुष्काची इतकी काळजी घेत असलेला पाहून चाहते सुखावले. पण याचवेळी काही युजर्सनी हे फोटो पाहताच अनुष्काला ट्रोल करण्याची संधीही साधली.

यावेळी अनुष्काने ब्लॅक कलरचा लॉन्ग टी-शर्ट घातला होता. तोंडावर मास्क आणि मोकळे केस असा तिचा लूक होता.

अनुष्काचा हा लॉन्ग टी-शर्ट पाहून काही युजर्सनी तिला कपड्यांवरून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी अनुष्का पँट घालायला विसरली का? अशा शब्दांत तिच्या कपड्यांची खिल्ली उडवली.

किमान अशा अवस्थेत तरी ढंगाचे कपडे घालायला हवेत ना, अशा अनेक प्रतिक्रिया या ट्रोलर्सनी दिल्या.

अनुष्का या महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. अद्याप तिच्या प्रसुतीची नेमकी तारीख कळलेली नाही.

कालपरवा विराट व अनुष्काचा त्यांच्या घरातील लॉबीतील फोटो व्हायरल झाले होते. विराट व अनुष्का घराच्या लॉबीत एकमेकांसोबत क्वालिट टाईम स्पेंड करत असताना पाहून काही फोटोग्राफर्सनी त्यांचे फोटो क्लिक केले होते. हेच फोटो नंतर व्हायरल झालेत. यामुळे अनुष्काचा पारा चढला होता.

सोशल मीडियावर पोस्ट लिहून तिने याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. आमच्या खासगी आयुष्यातील ढवळाढवळ थांबवा, अशा शब्दांत फोटोग्राफर्सला तिने फटकारले होते.