“मी प्रेग्नेंट झाली तर काय करणार?”; मुलगी आलियाच्या प्रश्नावर दिग्दर्शक अनुराग कश्यपचं बोल्ड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 08:10 PM2021-06-21T20:10:15+5:302021-06-21T20:14:16+5:30

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची मुलगी आलिया कश्यप ही सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. आलिया एक स्टारकिडसोबत यूट्यूबरही आहे. आलिया कश्यपनं फादर्स डेच्या निमित्तानं एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने अनुराग कश्यप यांना काही प्रश्न विचारले आहेत.

आलिया कश्यप आणि तिचा बॉयफ्रेंड शेन सध्या मुंबईत आहे. अनुरागसोबत तो राहत आहे. अनुराग कश्यपने या व्हिडीओत सांगितले की, आलियाचा बॉयफ्रेंड शेन ग्रोइगोइरला पसंत करतात की नाही, त्याशिवाय अनुरागने लग्नाआधी सेक्स याविषयावरही भाष्य केले आहे. आलियाच्या चाहत्यांनी अनुरागसाठी काही प्रश्न पाठवले होते.

आलियानं वडील अनुरागला विचारलं की, ते तिचा बॉयफ्रेंड शेनबद्दल काय विचार करतात? त्यावर अनुरागनं उत्तर दिलं की, मला शेन आवडतो. मला तुझ्या मित्रांची आणि विशेषत: मुलांची निवड करणं आवडतं. शेन खूप चांगला व्यक्ती आहे. तो अध्यात्मिक आहे. शांत स्वभावाचा आहे. जर आपण वेगवेगळ्या परिस्थितीचा विचार केला तर त्याच्या असे काही गुण आहेत जे वयाच्या ४० वर्षापर्यंतही कोणत्या व्यक्तीत नसतात.

मुलींनी तिच्या मित्रांसोबत ज्यात मुलं आहेत त्यांच्यासोबत वेळ घालवणं आणि फिरण्याबाबत अनुरागला विचारलं असता तो म्हणाला की, मला हे सगळं ठीक वाटतं. माझ्या विचाराने हा प्रश्न आई वडिलांना मुलांच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. परंतु मला वाटतं आता आई वडिलांनी समजून घेतले पाहिजे की, ज्या भारतात ते राहतात तो पहिल्यासारखा राहिला नाही.

तसेच अनुराग पुढे म्हणाला की, हे सगळं डोक्यात आणि शहरात आहे. आम्ही आमच्या मुलांपेक्षा अधिक दबावात वाढलो आहेत. आमची मुलं त्यांच्या भावना व्यक्त करण्यामध्ये आमच्याहून चांगले आहेत ते नेहमी चर्चा करतील. मला वाटतं जे आपल्यासोबत झालं आहे ते मुलांवर थोपवू नये.

इतकचं नाही तर अनुरागने खुलासा केलाय की, आलिया कश्यपने अनेकदा दारूच्या नशेत त्याला कॉल केला आहे. आलियाने तिच्या मित्रांसोबतही त्याचे बोलणं करून दिलं आहे. आलियाचे मित्र अनुराग कश्यपची फिल्म गँग्स ऑफ वासेपूरचे डायलॉग त्यांना ऐकून दाखवतात.

आलियाने अनुरागला विचारलं की, जर मी तुम्हाला दारूच्या नशेत कॉल केला तर काय होईल? त्यावर अनुरागनं तु असं अनेकदा केलंय, दारूच्या नशेत कॉल केलाय. पार्टीत असताना तु अनेकदा मित्रांशी मला बोलायला दिलं आहे. सर्वांसोबत माझं बोलणं होतं असंच तिला सांगितले.

आलिया कश्यपनं विचारलं की, जर ती बॉयफ्रेंडसोबत स्लीपओवर गेली तर? यावर अनुराग म्हणाला तु मोठी झाली आहे. तू तुझे निर्णय घेऊ शकतेस. मला यावर काही बोलण्याचा हक्क आहे असं मला वाटत नाही. मी फक्त तुझी चिंता करू शकतो. मी केवळ हेच सांगतो ध्यान ठेवत जा, माझा फोन नेहमी ऑन असेल तुला हवं तेव्हा तू कॉल करू शकते.

सर्वात कठीण प्रश्न आलियाने अनुरागला विचारला तो म्हणजे जर मी प्रेग्नेंट झाली तर काय रिएक्शन असेल? यावर तो म्हणाला की, तुला खरचं असं करायचं आहे का असं मी विचारेन. तू जो निर्णय घेशील त्यात मी साथ देईन हे तुला माहित्येय. तु जे करशील ते मी मान्य करेन. तुला या गोष्टीची किंमत चुकवावी लागेल परंतु मी तुझ्यासोबत असेन

त्याचसोबत लग्नाआधी सेक्सबाबत आलियानं अनुरागला विचारलं त्यावर त्याने उत्तर दिलं की, हा प्रश्न आम्ही ८० च्या दशकात विचारत होतो. मला वाटतं आपण या प्रश्नाच्या पुढे जायला हवं. आम्ही कॉलेजमध्ये असताना हा प्रश्न विचारत होतो. यावर आलिया म्हणाली आता असं करण्याची गरज मला वाटत नाही. सगळं काही वेळेपुढे निघून गेले आहे.

पुढे अनुराग म्हणतो की, नाही, आपल्याला सेक्सुअलिटी, सेक्स आणि आपलं शरीर समजायला हवं. दबावात येऊन काही करण्याआधी विचार करायला हवा. दिखाव्यासाठी करणं योग्य नाही. जे करायचं आहे ते करा कारण तुम्हाला ते करायची इच्छा आहे. तू तयार आहे तुझ्याकडे कोणी आहे. त्याचे स्पेशल असणं गरजेचे आहे.