Har Ghar Tiranga: अनुपम खेर ते राजकुमार राव, सेलिब्रेटींच्या घरोघरी डौलाने फडकला तिरंगा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 01:11 PM2022-08-15T13:11:15+5:302022-08-15T16:24:25+5:30

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाले, त्यानिमित्ताने भारत सरकारकडून ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले गेलं. देशभरातील अनेक कलाकारांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

अभिनेते अनुपम खेर यांनी देखील तिरंगासोबतचा फोटो आणि व्हिडीओ शेअर केला.

ट्विटरवर पोस्ट शेअर करताना अभिनेता अक्षय कुमारने लिहिले की, आजादी के 75 साल का अमृत महोत्सव मनाने का वक्त आ गया है। गर्व से शान से #हर घर तिरंगा लहराने का वक्त आ गया है।'

तेलुगू सुपरस्टार महेश बाबूनेह आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले, 'आपला तिरंगा... आपला अभिमान. #हर घर तिरंगा.'

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत लिहिले, 'मी पंतप्रधानांच्या हर घर तिरंगा या मोहिमेचा सम्मान करतो. ध्वजारोहण करण्यासाठी आम्ही जमलो आहोत.

द कश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवात सहभागी होत आपल्या घरावर तिरंगा फडकवला.

बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव यानेही 'हर घर तिरंगा' मोहिमेत सहभागी होताना घरी तिरंगा फडकवतानाचा फोटो शेअर केला आहे.