व्हायरल होत आहेत अनन्या पांडेचे हे फोटो, तुम्हीही पाहा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 04:03 PM2019-01-08T16:03:46+5:302019-01-08T16:09:58+5:30

बॉलिवूडच्या पॉप्युलर स्टार किड्सच्या यादीत अनन्या पांडे हिचे स्थान वरचे आहे. अभिनेता चंकी पांडेची ही लाडकी लेक लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. तूर्तास अनन्याचे काही फोटोंनी सोशल मीडियावर आग लावली आहे. तेव्हा पाहुया, तिचे असेच काही ग्लॅमरस फोटो...

२० वर्षांची अनन्या ‘स्टुडंट आॅफ द ईअर 2’ या चित्रपटातून डेब्यू करतेय. करण जोहर या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे.

या चित्रपटात अनन्या टायगर श्रॉफसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. चित्रपटात तारा सुतारिया ही सुद्धा मुख्य भूमिकेत आहेत. तिचाही हा डेब्यू सिनेमा आहे.

येत्या १० मे रोजी रिलीज होणारा हा चित्रपट पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित करतोय.

अनन्या पांडे सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे १० लाखांवर फॉलोअर्स आहेत.

सुहाना खान, सारा अली खान, ईशान खट्टर हे अनन्याचे खास मित्र आहेत. सुहानासोबत तर अनन्या अनेकप्रसंगी दिसली आहे.

अलीकडे अनन्याने एका लीडिंग कॉस्मेटिक ब्रांडसाठी शूट केले. अनन्याची आवडती अभिनेत्री काजोल आहे. अनन्या तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते. तूर्तास अनन्या व कार्तिक आर्यन एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनाही अनेकदा एकत्र पाहिले गेले.