PHOTOS : आजीच्या निधनानंतर अनन्या पांडेला अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 10:26 AM2021-07-11T10:26:54+5:302021-07-11T10:34:09+5:30

Chunky Pandey Mother Snehlata Pandey Passes Away : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिची आजी आणि अभिनेता चंकी पांडे याची आई स्नेहलता पांडे यांचे शनिवारी निधन झाले.

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिची आजी आणि अभिनेता चंकी पांडे याची आई स्नेहलता पांडे यांचे शनिवारी निधन झाले.

शनिवारी मुंबईतील त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्या ८५ वर्षांच्या होत्या.

आजीला अंतिम निरोप देताना अनन्या पांडे हिला अश्रू अनावर झाले.

अनन्या आजीची खूप लाडकी होती. अनन्याचाही आजीवर प्रचंड जीव होता.

अनन्याने आजीच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्यासोबत डान्स करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

अनन्याने आजीसोबत ‘स्टुटंडस आॅफ द इयर 2’ या सिनेमातील ‘जवानी’ गाण्यावर डान्स केला होता.

चंकी पांडे यालाही आईच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे.

चंकी यांच्या आईचे निधन नेमके कोणत्या कारणाने झाले,हे कळले नाही. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेक सेलिब्रिटी चंकी व त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आणि त्याच्या आईचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचले.