'तांडव' गर्ल अमायरा दस्तूरच्या ग्रीन ड्रेसमधील फोटोंची सोशल मीडियावर होतेय चर्चा, पहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 11:28 AM2021-01-14T11:28:54+5:302021-01-14T11:28:54+5:30

अमायरा दस्तूर १५ जानेवारीला रिलीज होणाऱ्या तांडव वेबसीरिजमध्ये झळकणार आहे.

अमायरा दस्तूरने रिलीजच्या आधी ग्लॅमरस फोटोशूट केले आहे, जे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

तांडवचे दिग्दर्शन अली अब्बास जफरने केले आहे. यात सैफ अली खान समर प्रताप सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे.

नुकतेच अमायरा दस्तूरने सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अमायरा दस्तूरने ग्रीन कलरचा ए लाइन ड्रेस कॅरी केला आहे.

अमायरा दस्तूरने करिअरची सुरूवात मॉडेल म्हणून केली. त्यावेळी ती फक्त 16 वर्षांची होती.

अमायराचा जन्म 7 मे 1993ला मुंबईत झाला.

अमायराने मनीष तिवारीचा रोमँटिक चित्रपट इस्साकमधून सिनेकारकीर्दीला सुरूवात केली. या चित्रपटात तिच्यासोबत प्रतीक बब्बर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अमायरा दस्तूर सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. तिचे इंस्टाग्रामवर 2.3 मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.