'तुम तो ठहरे परदेसी' गाण्याने बनवला होता रेकॉर्ड, आजकाल आहे तरी कुठे अल्ताफ राजा?

By अमित इंगोले | Published: October 15, 2020 09:42 AM2020-10-15T09:42:49+5:302020-10-15T09:53:36+5:30

'तुम तो ठहरे परदेसी' पासून सुरू झालेला अल्ताफ राजाचा प्रवास आजही लोकांच्या स्मरणात आहे. आजही त्याची गाणी आवडीने ऐकणारा एक वर्ग आहे. आज याच अल्ताफ राजाचा वाढदिवस आहे.

'तुम तो ठहरे परदेसी' या आपल्या गाण्याने सगळीकडे धमाका करणारा गायक अल्ताफ राजाच्या या गाण्याने रेकॉर्ड बनवला होता. कदाचित कोणत्याही नव्या गायकाचं गाणं इतकं हिट झालं नसेल. या गाण्यामुळे अल्ताफ राजाला अफाट लोकप्रियता मिळाली. संगीत क्षेत्रातही अल्ताफ राजाचं नाव मोठ्या अदबीने घेतलं जातं. त्याने आपल्या कव्वालीने एक वेगळी ओळख निर्माण केली. आज १५ ऑक्टोबरला अल्ताफ राजाचं वाढदिव आहे. त्यानिमित्ताने चला जाणून घेऊन अल्ताफ राजा आता कुठे आहे आणि काय करतोय.

गायक अल्ताफ राजाचा जन्म नागपुरात झाला होता. त्यांना संगीताचे धडे घरातूनन मिळाले होते. त्यांचे वडील इब्राहिम इकबाल कव्वाल आणि आई राणी रूपलता कव्वाल एकेकाळी प्रसिद्ध कव्वाल राहिले आहेत.

अल्ताफ राजाचं शिक्षण पुणे आणि मुंबईत झालं. पुण्यात ५ वर्षे राहिल्यावर तो मुंबईत आला. शिक्षण पूर्ण करून तो करिअरकडे लक्ष देऊ लागला. त्याने फॅशन डिझायनिंग आणि टेक्निकल इंजिनिअरींगचा कोर्स केला. पण त्याची आवड संगीतात अधिक होती.

मग आईच्या सांगण्यावरून त्याने संगीताकडे फोकस करणं सुरू केलं. अल्ताफने दिवंगत पंडित गोविंद प्रसाद जयपूरवाले यांच्याकडून सेमी-क्लासिकलचं ट्रेनिंग घेतलं. इकबाल खान साहब यांच्याकडून हार्मोनियमचे धडे घेतले. सुरूवातीला त्याने छोटे छोटे शोज केले. नंतर १९९६ मध्ये छोट्या लेव्हलवर 'तुम तो ठहरे परदेसी' अल्बम रेकॉर्ड केला.

बघता बघता हे गाणं लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहचलं. अल्ताफने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, हे गाणं त्याने १९९३ मध्ये सॅटेलाइट चॅनल 'झी' लॉन्च झालं होतं तेव्हा गायलं होतं. हा शो अनेक रिपीट करण्यात आला होता. लोकांना हे गाणं फारच आवडलं होतं.

जेव्हा १९९६ मध्ये अल्बम बनवण्याची वेळ आली तेव्हा अल्ताफने तुम तो ठहरे परदेसी सोडून इतर पाच गाणी टाकली. पण नंतर हे गाणंही त्यात टाकण्यात आलं. नंतर या गाण्यामुळे एक रेकॉर्ड कायम झाला.

सिनेमातही अल्ताफ राजाचं करिअर शिखरावर होतं. पण त्याला कधीही प्लेबॅक सिंगर बनायचं नव्हतं. अल्ताफ राजाची गझल सिंगर बनण्याची इच्छा होती. पण त्याच्या आईने त्याला समजावलं की, गझलच्या दुनियेत एका वयानंतर नाव होईल. तोपर्यत तुला स्ट्रगल करावं लागेल. तेव्हा तो सिनेमात गाणी गाऊ लागला.

अल्ताफने 'शपथ' सिनेमापासून आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली होती. यातील जॅकी श्रॉफ आणि मिथुनवर चित्रीत झालेल्या गाण्यातही तो दिसला होता. यातील 'थोडा इंतजार का मजा लिजिए' हे गाणंही सुपरहिट झालं.

अल्ताफ अजूनही संगीत क्षेत्रात सक्रीय आहे. नुकतंच त्याचं 'अपनी धुन' हे गाणं रिलीज झालं आहे. तशी तर कव्वालीमध्ये मेहंदी हसन, गुलाम अली, नूरजहां, रफी साहब, पंकज उदास, जगजीत सिंह यांची नावे घेतली जातात, पण अल्ताफ राजानेही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.