रिचा चड्डा-अली फजलने गुपचूप केलं लग्न? अभिनंदनाचा वर्षाव होताच डिलीट केली ‘ती’ पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 08:08 PM2021-05-23T20:08:51+5:302021-05-23T20:16:50+5:30

अलीने एक फोटो शेअर केला आणि अली व रिचाच्या लग्नाची चर्चा सुरु झाली.

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्डा आणि अभिनेता अली फजल यांच्या लग्नाची सध्या चर्चा रंगली आहे.

अलीने एक फोटो शेअर केला आणि अली व रिचाच्या लग्नाची चर्चा सुरु झाली.

अलीने शेअर केलेल्या फोटोत एक मेहंदी लावलेला हात दिसतोय. मोहब्बत डूडल मेहंदी के साथ, असे त्याने हा फोटो शेअर करताना लिहिले.

मग काय, अलीने हा फोटो शेअर केला आणि कमेंट्सचा पूर आला. क्षणात अली व रिचाचे अभिनंदन करणारे हजारो मॅसेज सुरु झालेत. गुड्डू भैय्या शादी कर लिये क्या? असा सवाल विचारून विचारून अनेकांनी अलीला भंडावून सोडले.

चाहतेच नाहीत तर हा फोटो पाहून अनेक सेलिब्रिटींनीही अली व रिचाला शुभेच्छा देण्यास सुरूवात केली.

आता रिचा व अलीने खरंच लग्न केले की नाही, हे आम्हाला ठाऊक नाही़ कारण आता अलीने ती पोस्ट डिलीट केली आहे.

गेली काही वर्षे रिचा आणि अली एकमेकांना डेट करत आहेत. मागील वर्षी दोघंही एकमेकांशी विवाह करणार होते. पण लॉकडाउनमुळे ते शक्य झालं नाही.

नुकतीच रिचा अलीच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली. अलीच्या समुद्र किनारी असलेल्या अपार्टमेंटमध्ये सध्या हे कपल राहतेय.

रिपोर्टनुसार, रॉबर्ट डाऊनी (ज्युनिअर)चा ‘चॅप्लिन’ हा सिनेमा पाहत असताना रिचाने अलीला प्रपोज केले होते. त्यावेळी अलीने काहीही उत्तर दिले नव्हते. यानंतर तीन महिन्यांनी अलीने रिचाला प्रपोज केले होते.