अक्षय कुमारच्या फॅन्ससाठी खुशखबर..! 'बच्चन पांडे'ची नवीन रिलीज डेट आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 12:42 PM2022-01-19T12:42:31+5:302022-01-19T12:42:31+5:30

अक्षय कुमार(Akshay Kumar)सोबत 'बच्चन पांडे' (Bachchan Pandey) चित्रपटात क्रिती सनॉन (Kriti Sanon) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अक्षय कुमारचा चित्रपट बच्चन पांडेच्या नवीन पोस्टरसोबत चित्रपटाच्या रिलीज डेटची देखील घोषणा करण्यात आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अक्षय कुमारने सोशल मीडियावर चित्रपटाचे दोन पोस्टर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

अक्षयने पोस्टर शेअर करून लिहिले की, अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स आणि ड्रामाने परिपूर्ण असा हा चित्रपट आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

एका पोस्टरमध्ये अक्षय कुमारच्या डोळ्यावर रंगीत चष्मा, गळ्यात चैन आणि खांद्यावर शस्त्र पाहायला मिळत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

दुसऱ्या पोस्टरमध्ये अक्षय कुमार त्याच्या पलटनसोबत ट्रॅक्टरवर हातातील शस्त्र दाखवताना दिसतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त क्रिती सनॉन, जॅकलिन फर्नांडिस, अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी, प्रतीक बब्बर, सहर्ष शुक्ला आणि अभिमन्यु सिंगदेखील आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हा सिनेमा होळीला म्हणजेच १८ मार्च, २०२२ ला रिलीज होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)