खरंच खिलाडी! 'बेल बॉटम'साठी अक्षय कुमारने मोडला स्वत:चा १८ वर्ष जुना नियम, सगळेच झाले थक्क...

By अमित इंगोले | Published: September 21, 2020 01:43 PM2020-09-21T13:43:58+5:302020-09-21T14:20:18+5:30

अक्षय कुमारसहीत सिनेमाची पूर्ण टीम प्रायव्हेट जेटने स्कॉटलॅंडला रवाना झाली होती. या सिनेमासाठी अक्षयने त्याचा एक १८ वर्षांपासूनच नियम स्वत:च मोडला आहे.

अभिनेता अक्षय कुमार हा मनाने किती मोठा आहे हे आपण अनेकदा ऐकलं आणि वाचलंय. आता आगामी 'बेल बॉटम' सिनेमाच्या प्रॉड्युसरसाठी अक्षय कुमार देवदूत बनला आहे. सध्या या सिनेमाचं शूटींग स्कॉटलॅडमध्ये सुरू आहे.

अक्षय कुमारसहीत सिनेमाची पूर्ण टीम प्रायव्हेट जेटने स्कॉटलॅंडला रवाना झाली होती. या सिनेमासाठी अक्षयने त्याचा एक १८ वर्षांपासूनच नियम स्वत:चा मोडला आहे.

अक्षय कुमार आणि बेल बॉटम टीमचे १४ दिवस क्वारंटाइनमुळे बेकार गेले होते. अक्षयने ही बाब समजून घेतली की, याने प्रोड्युसरचं आर्थिक नुकसान होणार. त्यामुळे त्याने १८ वर्षापासूनचा त्याचा नियम तोडला.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, अक्षय गेल्या १८ वर्षांपासून दिवसातील केवळ ८ तास करत आला आहे. पण आता या सिनेमाच्या शूटींग त्याने शिफ्ट डबल करण्याचा निर्णय घेतलाय. ही बाब ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

अक्षयचं असं करण्याचं कारण म्हणजे प्रॉडक्शन हाऊस पूजा एंटरटेन्मेंटचे पैसे वाचवणं आहे. त्यामुळे त्याने डबल शिफ्टमध्ये काम करणे सुरू केले आहे.

हा लॉकडाऊननंतरचा पहिला असा सिनेमा ठरलाय जो प्रत्येक तासात जास्तीत जास्त काम संपवत आहे. खास बाब ही आहे की, पूजा एंटरटेन्मेंट सेट्सवर आपल्या क्रू आणि कास्टची सुरक्षेची काळजी घेण्यात यशस्वी ठरली आहे.

बेल बॉटमचा प्रोड्यूसर जॅकी भगनानी यावर म्हणाला की, 'अक्षय कुमार हा पूर्णपणे प्रोड्यूसरचा अभिनेता आहे. आणि त्याच्यासोबत करणं हे आमचं भाग्य आहे. ते नेहमी प्रत्येक व्यक्तीबाबत विचार करतात'.

'अक्षय कुमार यूनिटच्या सेफ्टीपासून ते शूटींग शेड्यूल आणि प्रोड्यूसरची अडचण या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून असतो. तो सोन्यासारखा माणूस आहे. अक्षय १८ वर्षांत पहिल्यांदा डबल शिफ्टमध्ये काम करत आहे'.

'जेव्हा त्याने आम्हाला हा पर्याय सांगितला की, दोन यूनिट्ससोबत काम करणं योग्य ठरेल तेव्हा आम्ही सगळेच थक्क झालो होतो. आणि आनंदी होतो. त्याच्या कामाची पद्धत आणि एनर्जी पाहून सर्वांनाच एनर्जी येत आहे. सगळेच आपलं बेस्ट देत आहेत. हे एखाद्या मशीनसारखं पूर्ण वेळ काम करण्यासारखं आहे'.