अक्षय कुमार ते अक्षय खन्ना... फक्त याच अटीवर साईन करतात नवा सिनेमा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 04:13 PM2020-08-12T16:13:41+5:302020-08-12T16:22:08+5:30

बॉलिवूडचे अनेक बडे स्टार्स सिनेमे साईन करतात पण स्वत:च्या अटींवर... वाचा कोणाची काय असते डिमांड

सलमान खान - कुठलाही सिनेमा साईन करताना सलमान खान सर्वप्रथम एकच अट ठेवतो, ती म्हणजे आॅनस्क्रीन कुठल्याही अभिनेत्रीला किस करणार नाही ही. सोबत बोल्ड सीन्स देणार ही सुद्धा त्याची अट असते.

आमिर खान - आमिर खानला कुठल्याही स्थितीत लो अँगल शॉट देणे आवडत नाही. त्यामुळे असा कुठलाही शॉट देणार नाही, याच अटीवर तो सिनेमा साईन करतो.

अक्षय कुमार - अक्षय कुमारच्याही दोन अटी असतात. रविवारी काम करणार नाही आणि रात्री उशीरा शूटींगसाठी येणार नाही, याच अटीवर अक्षय नवा सिनेमा साईन करतो.

हृतिक रोशन - हृतिक रोशनच्या दोन अटी निर्मात्यांना मान्यच कराव्या लागतात. पहिली अट म्हणजे, बेस्ट जिम असेल त्याच लोकशनच्या शहरात शूटींग करणार आणि दुसरी अट म्हणजे पर्सनल शेफ सोबत येणार.

करिना कपूर - बेबो एकच अट ठेवते. ती म्हणजे, कुठल्याही बी ग्रेड स्टारसोबत काम करणार नाही. या अटीवरच निर्माते तिला साईन करतात.

कंगना राणौत - मी कुठल्याही प्रश्नाचे स्वत: उत्तर देणार नाही, तर माझा मॅनेजर उत्तर देईल, याच अटीवर कंगना राणौत सिनेमा साइन करते.

सोनाक्षी सिन्हा - सोनाक्षी सिन्हा किसींग सीन्स देण्याच्या विरोधात आहे. चित्रपट साईन करण्यापूर्वी ती नो किसींग सीन याच अटीवर सिनेमा साइन करते.

अक्षय खन्ना - चित्रपटातील भूमिका मर्यादेपेक्षा अधिक निगेटीव्ह नसावी, शिवाय हिरोकडून मार खाणार नाही, या दोन अटीवर अक्षय खन्ना सिनेमा साईन करतो.