सुशांतच्या मृत्यूचा या स्टार्सच्या आगामी सिनेमांवर होणार इफेक्ट? मोठी आहे यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 04:35 PM2020-06-19T16:35:24+5:302020-06-19T16:43:45+5:30

सुशांत सिंग राजपूतच्या निधनाने चाहते संतापात आहेत. सोशल मीडियावर हा संताप ठळकपणे दिसतोय.

सुशांत सिंग राजपूतच्या निधनाने चाहते संतापात आहेत. या संतापाचा फटका येत्या काळात काही स्टार्स किड्सलाही बसण्याची शक्यता आहे. कारण अनेकांनी स्टार्स किड्सच्या सिनेमांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.

सुशांतच्या मृत्यूनंतर करण जोहर, सलमान खान, एकता कपूर, संजय लीला भन्साळी नेटक-यांच्या निशाण्यावर आहेत. करणची लाडकी आलियाही नेटक-यांच्या संतापाचा सामना करावा लागतोय. येत्या काळात सडक2, गंगुबाई, ट्रिपल आर, ब्रह्मास्त्र असे तिचे अनेक सिनेमे रिलीज होत आहेत.

अनन्या पांडे - चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेचा फाइटर आणि खाली पीली हे दोन सिनेमे येत्या काळात प्रदर्शित होणार आहेत.

जान्हवी कपूर - जान्हवी कपूरच्या झोळीत सध्या चार सिनेमे आहेत. गुजंन सक्सेनाचे बायोपिक लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज होतेय. पण याशिवाय तख्त, रूही अफजाना, दोस्ताना 2 हे सिनेमे रांगेत आहेत.

सोनम कपूर- सुशांतच्या मृत्यूनंतर सोनम कपूर ट्रोल झाली होती. येत्या काळात बॅटल आॅफ बिट्टोरा या सिनेमात ती दिसणार असल्याची चर्चा आहे. वीरे दी वेडिंग 2 मध्येही तिची वर्णी लागल्याचे मानले जात आहे.

शनाया कपूर - संजय कपूरची लेक शनाया हिला करण जोहर लॉन्च करणार आहे. असे झाले तर तिच्या चित्रपटाला कसा व किती प्रतिसाद मिळतो, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

श्रद्धा कपूर - श्रद्धा लवकरच लव रंजनच्या सिनेमात दिसणार आहे.

सारा अली खान - साराचा अतरंगी रे आणि कुली नंबर 1 हे दोन सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.

अर्जुन कपूर - अर्जुन कपूर लवकरच भूषण कुमारच्या नव्या सिनेमात दिसणार आहे. गेल्या वर्षीच भूषण कुमारने या सिनेमाची घोषणा केली होती.

शाहिद कपूर - शाहिद जर्सी नामक सिनेमात दिसणार आहे.

टायगर श्रॉफ - टायगरचे हिरोपंती 2 आणि बागी 4 हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.