जान्हवी कपूरचा फोटो पाहून चाहत्यांना आली श्रीदेवी यांची आठवण, सोशल मीडियावर झाला तो फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 05:08 PM2021-01-07T17:08:34+5:302021-01-07T17:17:02+5:30

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची कन्या जान्हवीने पहिलाच सिनेमा 'धडक' मधून साऱ्यांनाच प्रभावित केलं. मुळात जान्हवीच्या रुपात चाहते श्रीदेवी यांची आठवण करतात.

अजूनही अभिनेत्री श्रीदेवी या जगात नाहीत ही कल्पना कुणालाच करवत नाही. रसिक असो किंवा सेलिब्रिटी प्रत्येकालाच ‘हवाहवाई’ श्रीदेवी यांच्या जाण्याने धक्का बसला होता.

श्रीदेवी या हरहुन्नरी आणि अष्टपैलू अशा नायिका होत्याच. त्यासोबत रिअल लाईफमध्ये त्या प्रेमळ आईसुद्धा होत्या.

जान्हवी आणि खुशी या दोन्ही लेकींसह श्रीदेवी यांचं एक वेगळं आणि घट्ट नातं होतं.

ब-याचदा श्रीदेवी आपल्या लेकींसह बॉलीवुड इव्हेंट्स आणि पार्ट्यांमध्ये पाहायला मिळायच्या. त्यामुळे या दोन्ही लेकी वडिलांपेक्षा आईजवळ जास्त होत्या.

दिवंगत अभिनेत्री आणि बॉलीवूडची चांदनी असणाऱ्या श्रीदेवी यांची लेक असल्याने जान्हवीकडून साऱ्यांनाच खूप अपेक्षा आहेत.

त्यामुळेच श्रीदेवी यांच्या गाजलेल्या अनेक सिनेमांपैकी कोणत्या सिनेमाच्या रिमेकमध्ये काम करायला आवडेल असा प्रश्न जान्हवीला एका मुलाखतीत विचारण्यात आला.

त्यावर क्षणाचाही विलंब न लावता श्रीदेवी यांच्या गाजलेल्या 'सदमै' सिनेमाचा रिमेक व्हावा आणि त्यात श्रीदेवी यांनी साकारलेली भूमिका साकारायला आवडेल अशी प्रतिक्रिया जान्हवीने दिली होती.

सदमा सिनेमातील श्रीदेवी यांनी साकारलेली नेहलता आणि कमल हासनचा सोमू रसिकांना भावला होता.

सदमा सिनेमातील श्रीदेवी यांच्या आव्हानात्मक भूमिका साकारत आईच्या पावलावर पाऊल ठेवून बॉलीवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचं जान्हवीचं स्वप्न आहे.

सोशल मीडियावर अनेकदा तिचे फोटो पाहून तिच्यात श्रीदेवी यांची झलक शोधण्याचा चाहते प्रयत्न करतात.

जान्हवीचे फोटो पाहून श्रीदेवी यांच्या आठवणीत चाहते रमताना दिसतात.

जान्हवीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून अनेकांनी तरुणपणातली श्रीदेवीची आठवण झाल्याचे कमेंट करत असल्याचे पाहायला मिळतंय.