या 9 सिनेमांवर मेकर्सनी खर्च केला पाण्यासारखा पैसा, 3000 कोटी कशाला म्हणतात राव!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 05:36 PM2021-12-01T17:36:17+5:302021-12-01T17:48:26+5:30

Mythological Films : येत्या दोन वर्षांत अनेक पौराणिक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत आणि यावर पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आलाय...

रामायणावर आधारित आदिपुरूष या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास, सैफ अली खान यांच्या भूमिका असलेला हा सिनेमा ओम राऊत दिग्दर्शित करतोय आणि या चित्रपटाचा बजेट किती तर 500 कोटींपेक्षा अधिक आहे.

बाहुबली फेम दिग्दर्शक एस एस राजमौली ‘आरआरआर’ नावाचा सिनेमा घेऊन येत आहेत. ज्युनिअर एनटीआर, राम चरण, आलिया भट, अजय देवगण अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचा बजेट 350 कोटी आहे.

सीता- द इन्कारनेशन हा पीरियड ड्रामाही येतोय. अलौकिक देसाई दिग्दर्शित या सिनेमात कंगना राणौत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा बजेटही 300 कोटींपेक्षा अधिक असल्याचं कळतंय.

ब्रह्मास्त्र हा रणबीर कपूर, आलिया भट, अमिताभ बच्चन यांचा सिनेमाही चर्चेत आहे. याचा बजेटही 300 कोटींपेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे, हा पहिल्या भागाचा बजेट आहे. असे एकूण तीन भागात हा सिनेमा येणार आहे.

द इम्मोर्टल अश्वत्थामा यात विकी कौशल लीड भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा बजेट 350 कोटींपेक्षा अधिक आहे. बजेट वाढल्यामुळे हा चित्रपट सध्या होल्डवर ठेवण्यात आल्याचीही चर्चा आहे.

दुस-या महायुद्धवर आधारि द गुड महाराजा या सिनेमात संजय दत्त लीड रोलमध्ये आहे आणि या चित्रपटावर 400 कोटी रूपये खर्च होणार आहेत.

शमशेरा हा रणबीर कपूरचा चित्रपटही या यादीत आहे. या चित्रपटाचा बजेट 150 कोटी रूपये आहे. रणबीर यात डबल रोलमध्ये दिसणार आहे.

अक्षय कुमारचा राम सेतू या सिनेमाचे बजेटही तब्बल 400 कोटींच्या घरात असल्याचे बोललं जातंय. अभिषेक शर्मा हा सिनेमा दिग्दर्शित करतोय.

रामायण ट्रायलॉजी हा रामायणावर आधारित आणखी एक पीरियड ड्रामा नितेश तिवारी दिग्दर्शित करणार आहेत. या चित्रपटासाठी मेकर्सनी 500 कोटींचा बजेट राखून ठेवला आहे.