PHOTOS : मौनी रॉयचा किलर लुक, शेअर केले समुद्र किनाऱ्यावरचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 05:17 PM2022-05-15T17:17:21+5:302022-05-15T17:22:40+5:30

Mouni Roy: मौनीचे समुद्र किनाऱ्यावरचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत आणि चाहते या फोटोंवर फिदा आहेत. पांढऱ्या ड्रेसमध्ये मौनीनं एकापेक्षा एक खल्लास पोझ दिल्या आहेत.

टीव्हीची सर्वाधिक लोकप्रिय ‘नागीन’ मौनी रौय हिची बातचं न्यारी. जिथे जाईल तिथे मौनी माहौल करते. तिची एक एक अदा वेड लावते.

सध्या तिचे समुद्र किनाऱ्यावरचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत आणि चाहते या फोटोंवर फिदा आहेत. पांढऱ्या ड्रेसमध्ये मौनीनं एकापेक्षा एक खल्लास पोझ दिल्या आहेत.

मौनी सध्या पती सूरज नांबियारसोबत व्हॅकेशनवर आहे. व्हॅकेशनचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पांढऱ्या थाई स्लिट आऊटफिटमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

फोटोत मौनी मस्तीमूडमध्ये दिसतेय. या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. सुंदर, गॉर्जियस, ग्लॅमरस, हॉट अशा शब्दांत चाहत्यांनी या फोटोंवर कमेंट्स करताना लिहिलं आहे.

मौनी सध्या एक डान्स रिअ‍ॅलिटी शो जज करतेय. लवकरच तिचा ब्रह्मास्त्र हा सिनेमा रिलीज होतोय. या चित्रपटात ती रणबीर कपूर, आलिया भट व अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करतेय.

मौनी रॉयने यावर्षी जानेवारीत सूरज नांबियारसोबत लग्नगाठ बांधली होती. गोव्यात हा लग्न सोहळा पार पडला होता. आधी दोघांनीमल्याळी रितीरिवाजांनुसार आणि नंतर बंगाली रितीरिवाजानुसार सुद्धा लग्न केलं होतं.

मौनीचा हबी सूरज हा दुबईत राहतो. बिझनेसमॅन आणि बँक इव्हेस्टर अशी त्याची ओळख आहे. सूरज हा मूळचा बेंगळुरूचा. सूरजने आर.व्ही.अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनीअरिंगमधील बी.टेक केलं आहे.

आता सूरज व मौनीची ओळख कशी झाली तर दुबईत. लॉकडाऊनमध्ये मौनी रॉय आणि सूरज एकमेकांना प्रथमच भेटले होते. लॉकडाऊनदरम्यान मौनी दुबईत अडकली होती. या दिवसांत ती तिच्या बहिणीच्या घरी होती. बहिणीच्या माध्यमातून तिची सूरजसोबत ओळख झाली होती.