प्रेग्नंसीदरम्यानही स्वतःला इतकी फिट ठेवतेही अभिनेत्री, पाहा तिच्या भन्नाट योगा पोज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 06:18 PM2021-04-05T18:18:55+5:302021-04-05T18:27:12+5:30

Geeta Basra Pregnancy: भारतीय संघाचा क्रिकेटर हरभजन सिंह दुसऱ्यांदा पिता होणार आहे. त्याची पत्नी अभिनेत्री गीता बसरानं ही गुड न्यूज शेअर केली होती

अभिनेत्री गीता बसराने ती दुस-यांदा प्रेग्नंट असल्याची गुड न्यूज चाहत्यांसह शेअर करताच चाहत्यांनी अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव केला होता.

गीता बसरा सध्या तिची प्रेग्नंसी एन्जॉय करत असून फिटनेसवरही मेहनत घेत असल्याचे फोटो समोर आले आहेत.

प्रेग्नंसी काळाता अगदी फिट आणि हेल्दी राहण्यासाठी गीता बसरा सध्या खूप मेहनत घेत आहे.

गरोदर काळातही योगा करणे फायदेशीर असल्याचं सांगत काही योगासनांच्या पोजेस मधील फोटोज शेअर केले आहेत.

उत्तम आरोग्यासाठी गीता बसरा अथक मेहनत घेत असल्याचे यातून दिसते.

उलट गरोदरपणाच्या काळात स्त्रिया जितक्या अ‍ॅक्टिव्ह राहतील, आनंदी राहतील ते बाळासाठी फायदेशीर असल्यामुळे ती नित्यनिमाने योगा करते.

तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर देखील तिच्या योगा पोझेस मधील फोटोज तिच्या चाहत्यांसाठी शेअर करते.

प्रेग्नंसीदरम्यानही गीता आपल्या फिटनेससाठी किती मेहनत घेते आहे तिच्या फोटोवरुन लक्षात येते.

गीता या वर्षी जुलै महिन्यात दुसऱ्यांदा बाळाला जन्म देणार आहे.

हरभजन आणि गीता बसरा यांची एक पाच वर्षाची मुलगी आहे, जिचं नाव हिनाया आहे.

गीता बसराने 2006 मध्ये इमरान हाशमीसोबत 'दिल दिया है' या चित्रपटाद्वारे पदार्पण केलं होतं.

हवे तसे यश गीता बसराला मिळाले नाही,लग्नानंतर ती बॉलिवूडासून दूर जात संसारात रमली.