PICS : याच्यापुढे रणवीर सिंगही फिका! साहिल सलाथियाची विचित्र फॅशन पाहून थक्क व्हाल!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 04:08 PM2021-11-12T16:08:56+5:302021-11-12T16:17:58+5:30

Sahil Salathia : रणवीर सिंगचे अतरंगी, चित्रविचित्र कपडे तुम्ही पाहिले असतीलच. पण रणवीर एकटा नाही. हा एक अभिनेता तर त्याच्याही पुढे आहे.

रणवीर सिंगचे अतरंगी, चित्रविचित्र कपडे तुम्ही पाहिले असतीलच. पण रणवीर एकटा नाही. हा एक अभिनेता तर त्याच्याही पुढे आहे.

होय, या अभिनेत्याचे नाव काय तर साहिल सलाथिया. होय, साहिलचे फोटो पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल.

पेशाने मॉडेल आणि अभिनेता असलेला साहिल रणवीरसारखाच त्याच्या अतरंगी फॅशन सेन्ससाठी ओळखला जातो.

कधी स्कर्ट घालून तर कधी चित्रविचित्र लुकचे अनेक फोटो त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर बघायल मिळतील.

कधी स्कर्ट घालून, कधी गळ्यात मोत्यांची माळ घालून तर कधी नखांना नेलपेंट लावून साहिल अगदी बिनधास्त पोज देतो.

साहिलने अनेक वेबसीरिज व चित्रपटांमध्ये लहानमोठ्या भूमिका साकारल्या आहेत.

‘पानीपत’ या चित्रपटातून त्याने आपल्या बॉलिवूड करिअरची सुरूवात केली होती. या चित्रपटात त्याने शमशेर बहादूरची भूमिका साकारल होती.

काही दिवसांपूर्वी चर्चे आलेल्या ‘पौरषपूर’ या वेबसीरिजमध्येही तो दिसला होता.

हसमुख आणि एव्हरेस्ट सारख्या टीव्ही शोमध्येही तुम्ही त्याला बघितलं असेल.

साहिलला ‘बिग बॉस 14’ची ऑफरही मिळाली होती. पण साहिलने ही ऑफर धुडकावून लावली होती.

Read in English