Then And Now: पूर्वीपेक्षाही सुंदर दिसते अक्षय कुमारची ही हिरोईन, दोन वर्षाआधीच लग्न करत सिनेसृष्टीपासून झाली दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 06:43 PM2021-11-20T18:43:26+5:302021-11-20T18:48:52+5:30

19 वर्षांपूर्वी अक्षय कुमारसोबत 'आवारा पागल दीवाना' या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री आरती छाब्रिया 39 वर्षांची झाली आहे.आरतीने 2000 साली 'मधुरक्षणम' या तेलुगु चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली.

तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट 2001 मधला लज्जा होता. आरती फिल्मी करिअरमध्ये फार काही यशस्वी ठरली. बहुतेक चित्रपटांमध्ये साइड रोल किंवा पाहुण्या कलाकरांच्या भूमिकेत ती झळकली.

तिला चित्रपटांमध्ये यश मिळत नाही हे पाहून आरतीने 11 मार्च 2019 रोजी ऑस्ट्रेलियामध्ये राहणारा विशारद बदेसी यांच्याशी लग्न केले.यानंतर आरती छाब्रियाने 23 जून 2019 रोजी विशारदसोबत परदेशात शिफ्ट झाली. मॉरिशस आणि ऑस्ट्रेलियामध्ये राहण्याव्यतिरिक्त, आरती मधल्या काळात मुंबईलाही येत असते.

आरती सध्या फिल्मी दुनियेपासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असते.आरती अनेकदा तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. चित्रपट आणि जाहिरातींव्यतिरिक्त तिने 'नशा ही नशा है' सारख्या अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही काम केले आहे.

आरतीने मॅगी नूडल्स, पेप्सोडेंट टूथपेस्ट, क्लीन अँड क्लियर फेस वॉश, अमूल फ्रॉस्टिक आइस्क्रीम आणि क्रॅक क्रीम यासह अनेक ब्रँडची जाहिरात केली आहे.आरतीने नशा ही नशा है, हॅरी आनंदच्या चाहत आणि अदनान सामीच्या गाण्यातील म्युझिक अल्बममध्येही काम केले आहे.

आरती शेवटची 2010 मध्ये आलेल्या 'दस तोला' चित्रपटात दिसली होती. याशिवाय ती 2011 मध्ये खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोमध्येही दिसली होती. तिने विजेतेपद पटकावले होते.आरती छाब्रिया शेवटची 2010 मध्ये 'दस तोला' या चित्रपटात दिसली होती. यानंतर आरती 'खतरों के खिलाडी 4' आणि 'झलक दिखला जा 6' सारख्या टीव्ही शोमध्येही दिसली आहे.

आरती टीव्ही सीरियल 'डर सबको लगता है' च्या एका एपिसोडमध्येही दिसली आहे.1 एप्रिल 2017 रोजी, आरती छाब्रियाने मुंबई वाराणसी एक्सप्रेस या लघुपटातून दिग्दर्शक आणि निर्माती म्हणून पदार्पण केले. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि या चित्रपटाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुरस्कारही जिंकली आहेत.

आरती आता दिग्दर्शन आणि चित्रपट निर्मितीमध्येच सध्या आपले नशीब आजमवत आहे.आरतीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तिने लज्जा, आवारा पागल दीवाना, तुमसे अच्छा कौन है, राजा भैया, अब तुमसे हवाले वतन साथिया, शादी नंबर वन, सुख, शूटआऊट एट लोखंडवाला, पार्टनर, हे बेबी, डैडी कूल, टॉस, किससे प्यार करूं आणि दस तोला चित्रपटातल्या तिच्या भूमिकेला विशेष पसंती मिळाली होती.