बॉलिवूडच्या 'या' 8 अभिनेत्रींनी फिटनेससाठी सोडलं नॉनव्हेज; आता आहेत Pure Vegetarian

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 03:52 PM2021-12-17T15:52:31+5:302021-12-17T15:57:42+5:30

Bollywood actress:बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या फिटनेसकडे कायम लक्ष देत असतात. त्यामुळे अनेकदा त्या त्यांच्या खाण्यावर नियंत्रण ठेवतात. यामध्येच गोड, तेलकट पदार्थ खाणं त्या हमखास टाळतात.

बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या फिटनेसकडे कायम लक्ष देत असतात. त्यामुळे अनेकदा त्या त्यांच्या खाण्यावर नियंत्रण ठेवतात. यामध्येच गोड, तेलकट पदार्थ खाणं त्या हमखास टाळतात. परंतु, बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत. ज्यांनी फिटनेससाठी नॉनव्हेज सोडलं असून आता त्या प्युअर व्हेजिटेरिअन आहेत. त्यामुळे या अभिनेत्री कोणत्या ते पाहुयात.

तमन्ना भाटिया - तमन्नाने नॉन व्हेज खाणं बंद केलं असून ती प्युअर व्हेजिटेरिअन आहे.

शिल्पा शेट्टी - आपला फिटनेस जपण्यासाठी शिल्पा शेट्टीने नॉन व्हेज खाणं बंद केलं.

मनिषा लांबा - मनिषा लांबाला प्राण्यांची विशेष आवड आहे. त्यामुळे तिने नॉन व्हेज खाणं बंद करण्याचा निर्णय घेतला.

जेनेलिया डिसुझा - जेनेलियाने नॉन व्हेज खाणं जवळपास ४ वर्षांपूर्वीच बंद केलं आहे. इतकंच नाही तर तिने नॉन व्हेजला पर्याय म्हणून स्वत:ची 'Imagine Meats' नवाचा एक ब्रँडही सुरु केला आहे. या कंपनीमध्ये वनस्पतींपासून मांस तयार केलं जातं. थोडक्यात ते दिसताना मांस असल्याप्रमाणे दिसते. त्यामुळे नॉन व्हेज लव्हरसाठी हा पर्याय बेस्ट आहे.

भूमि पेडणेकर- भूमिने २०२० मध्ये लॉकडाउनच्या काळात नॉन व्हेज सोडण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने ही माहिती दिली होती.

श्रद्धा कपूर - दोन वर्षांपूर्वी श्रद्धाने नॉन व्हेज सोडण्याचा निर्णय घेतला. आता ती प्युअर व्हेजिटेरिअन आहे.

आलिया भट्ट - आलियाला नॉनव्हेजची विशेष आवड नाही. त्यामुळे तिने आता पूर्णपणे व्हेजिटेरिअन व्हायचा निर्णय घेतला आहे.

सोनम कपूर - बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर प्युअर व्हेजिटेरिअन असून तिने कित्येक वर्षांपासून नॉनव्हेजला हात लावलेला नाही. सोनम सी फूड लव्हर होती. त्यामुळे तिला मासे खायला विशेष आवडायचे. परंतु, तिने नॉनव्हेज खाणं बंद केलं. इतकंच नाही तर ती डेअरी प्रोडक्ट्सदेखील खात नाही. नॉनव्हेज आणि डेअरी प्रोडक्टमुळे तिला हेल्थ इश्शू होत असल्याचं सांगण्यात येतं.