Venus Transit 2021: शुक्र-मंगळाचा कर्क राशीत संयोग; ‘या’ ८ राशींना उत्तम लाभदायक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 02:11 PM2021-06-22T14:11:52+5:302021-06-22T14:25:22+5:30

Venus Transit 2021: शुक्र मिथुन राशीतून कर्क राशीतून प्रवेश करत आहे. कोणत्या राशींना आगामी कालावधी उत्तम लाभदायक ठरेल, कोणत्या राशीच्या व्यक्तींनी या कालावधीत काय काळजी घ्यावी, जाणून घेऊया...

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह काही ठराविक कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. आता शुक्र मिथुन राशीतून कर्क राशीतून प्रवेश करत आहे. शुक्र हा कला, संगीत, रोमान्स, दाम्पत्य जीवन यांचा कारक मानला गेला आहे.

कर्क राशीत शुक्राचा मंगळाशी संयोग होत आहे. तसेच गुरू सहाव्या स्थानी असल्यामुळे गुरू आणि शुक्रचा षडाष्टक योग जुळून येत आहे. २२ जून रोजी दुपारनंतर शुक्र कर्क राशीत प्रवेश करत असून, १७ जुलैपर्यंत शुक्र कर्क राशीत विराजमान असेल.

शुक्रचा कर्क प्रवेश, मंगळाशी होत असलेला संयोग तसेच शुक्र गुरूशी जुळून येत असलेला षडाष्टक योग याचा सर्व राशीच्या व्यक्तींवर प्रभाव पडणार असल्याचे सांगितले जात आहे. कोणत्या राशींना आगामी कालावधी उत्तम लाभदायक ठरेल, कोणत्या राशीच्या व्यक्तींनी या कालावधीत काय काळजी घ्यावी, जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींसाठी शुक्रचा कर्क प्रवेश सामान्य असेल. सुख-सुविधा वाढू शकतील. प्रेमात असलेल्या व्यक्तींसाठी आगामी काळ उत्तम राहील. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकेल. मात्र, मन आणि भावना यांवर नियंत्रण ठेवावे, असे सांगितले जात आहे.

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्रचा कर्क प्रवेश शुभ लाभदायक ठरू शकेल. या आगामी काळात नोकरदार वर्गाला उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील. भावंडांशी असलेले संबंध सुधारू शकतील. मात्र, आरोग्याची काळजी घेणे हिताचे ठरेल, असे सांगितले जात आहे.

मिथुन राशीच्या व्यक्तींना शुक्रचा कर्क प्रवेश काहीसा चिंताजनक ठरू शकतो. आरोग्याची काळजी घ्यावी. मात्र, दुसरीकडे गुंतवणुकीसाठी चांगला कालावधी आहे, असे सांगितले जात आहे.

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी शुक्रचा होत असलेला प्रवेश चांगला ठरू शकेल. प्रवासाचे योग संभवतात. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे सांगितले जात आहे.

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी शुक्रचा कर्क प्रवेश शुभ फलदायक ठरू शकेल. हाती घेतलेली कामे पूर्ण होऊ शकतील. परदेशातून लाभ संभवतो. नोकरदार वर्गाला उत्तम संधी प्राप्त होऊ शकतात. तर दुसरीकडे खर्चाचे प्रमाण वाढू शकते, असे सांगितले जात आहे.

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी शुक्रचा कर्क प्रवेश सामान्य ठरू शकेल. काही प्रोजेक्ट पूर्ण होतीलच असे नाही. पण प्रयत्नांची कास सोडू नये. डोळ्यांची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांसाठी आगामी कालावधी उत्तम असू शकेल. तसेच मित्रांशी असलेले संबंध दृढ होऊ शकतील, असे सांगितले जात आहे.

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्रचा कर्क प्रवेश उत्तम ठरू शकेल. घरातील ज्येष्ठांनी शक्यतो प्रवास टाळावा. मेडिकल, इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना आगामी कालावधी चांगला ठरेल. मालमत्तेत गुंतवणूक करण्याच्या योजना आखू शकाल. मात्र, सर्व गोष्टींची चाचपणी केल्यावरच बाबी निश्चित कराव्यात, असे सांगितले जात आहे.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी शुक्रचा कर्क प्रवेश संमिश्र ठरू शकेल. आपल्यातील क्षमतेत बदल होऊ शकेल. विद्यार्थी वर्गाला त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकेल. आर्थिक आघाडीवर आगामी कालावधी ठीकठाक असेल. कर्जाचे व्यवहार शक्य असल्यास पुढे ढकलावे. नियमितपणे हनुमान पूजन करणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

धनु राशीच्या व्यक्तींसाठी शुक्रचा कर्क प्रवेश संमिश्र ठरू शकेल. आर्थिक लाभ मिळू शकतील. मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. रोजगाराच्या शोधात असलेल्या व्यक्तींना शुभवार्ता मिळू शकतील, असे सांगितले जात आहे.

मकर राशीच्या व्यक्तींसाठी शुक्रचा कर्क प्रवेश चांगला ठरू शकेल. दाम्पत्य जीवन उत्तम राहू शकेल. आपल्या मताला प्राधान्य दिले जाऊ शकेल. नोकरदार वर्गाला अनुकूल बदल पाहायला मिळू शकतील. आर्थिक आघाडी स्थिर राहू शकेल. प्रशंसा होऊ शकेल. गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्रचा कर्क प्रवेश संमिश्र ठरू शकेल. अनावश्यक खर्च टाळावेत. नोकरदार वर्गाला काहीसे चढ-उतार पाहायला मिळू शकतात. गुंतवणूक करताना सर्व गोष्टींची चाचपणी करून मगच निर्णय घ्यावेत, असे सांगितले जात आहे.

मीन राशीच्या व्यक्तींसाठी शुक्रचा कर्क प्रवेश उत्तम ठरू शकेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींसाठी आगामी कालावधी अनुकूल असेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला ठरू शकेल. अविवाहितांना शुभवार्ता मिळू शकतील. संपत्तीचे वाद मिटू शकतील, असे सांगितले जात आहे.