Vrishabha Sankranti 2022: सूर्याचा वृषभ प्रवेश: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना यशकारक काळ; आर्थिक स्थितीत होईल वृद्धी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 11:13 AM2022-05-12T11:13:06+5:302022-05-12T11:19:29+5:30

Vrishabha Sankranti 2022: नवग्रहांचा राजा सूर्य वृषभ राशीत प्रवेश करणार असून, नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना त्याचा लाभ होऊ शकेल, ते जाणून घ्या...

ज्योतिषीय दृष्टिकोनातून मे महिना उत्तम ठरणारा आहे. नवग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य मंगळाच्या मेष राशीतून शुक्राचे स्वामित्व असलेल्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या वृषभ राशीतील राशीसंक्रमणाला वृषभ संक्रांत म्हटले जाते. (Sun Transit Taurus 2022)

ज्योतिषशास्त्रात सूर्याला नेतृत्व, करिअरचा कारक मानले जाते. तसेच कुंडलीत सूर्य मजबूत असण्याचे अनेक फायदे मिळू शकतात, असे सांगितले जाते. (Surya Gochar Vrishabha Rashi 2022)

नवग्रहांचा राजा सूर्य १५ मे २०२२ रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना सूर्याचा वृषभ प्रवेश चांगला ठरणार आहे. ते जाणून घेऊया... (Vrishabha Sankranti 2022)

सूर्याचा राशीबदल मेष राशीच्या व्यक्तींना सकारात्मक ठरू शकेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकेल. मिळकतीचे नवे स्रोत मिळू शकतील. आगामी कालावधी लाभदायक ठरू शकेल. करिअरमध्ये यश व प्रगतीचे मार्ग साध्य होऊ शकतील. मालमत्ता, जमीन खरेदीचे व्यवहार यशस्वी होऊ शकतात. मात्र, या काळात कौटुंबिक वादापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

सूर्याचा राशीबदल वृषभ राशीच्या व्यक्तींना प्रगतीकारक ठरू शकेल. नोकरदार वर्गाला या कालावधीत हाती घेतलेल्या कामात यश मिळू शकेल. व्यापारी वर्गाला मेहनतीचे फळ मिळू शकेल. लाभाच्या उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतील. करिअरमध्ये यशाची नवी उंची गाठू शकाल. आर्थिक स्थिती मजबूत राहू शकेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकेल.

सूर्याचा राशीबदल कर्क राशीच्या व्यक्तींना यशकारक ठरू शकेल. या कालावधीत आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकेल. नानाविध लाभ मिळू शकतील. नोकरीत पदोन्नती, वेतनवृद्धीचे योग जुळून येऊ शकतील. व्यापारी वर्गाला गुंतवणुकीतून फायदा मिळू शकेल. समाजात मान-सन्मान प्राप्त होऊ शकतील.

सूर्याचा राशीबदल सिंह राशीच्या व्यक्तींना अनुकूल ठरू शकेल. कार्यक्षेत्रात यश व प्रगतीचे मार्ग साध्य होऊ शकतील. कार्यालयात मान-सन्मान प्राप्त होऊ शकतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक होऊ शकेल. नोकरदारवर्गाला पदोन्नतीचे योग जुळून येऊ शकतील. प्रवास करू शकाल.

सूर्याचा राशीबदल कन्या राशीच्या व्यक्तींना भाग्यकारक ठरू शकेल. आगामी काळात नशिबाची चांगली साथ मिळू शकेल. नोकरदार वर्गाला नवीन संधी प्राप्त होऊ शकतात. व्यापारी वर्गाला फायदा मिळू शकेल. कुटुंबात मंगलकार्याचे नियोजन करू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहू शकेल.

सूर्याचा राशीबदल मीन राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरू शकेल. प्रलंबित तसेच अडकलेली कामे या कालावधीत मार्गी लागू शकतात. एखाद्या वादाचे निराकरण होऊ शकेल. नोकरीत चांगल्या संधी प्राप्त होऊ शकतील. व्यवसायिक, व्यापाऱ्यांना संमिश्र परिणाम दिसून येऊ शकतील.