नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा तुमच्या राशीसाठी काय घेऊन येतोय पहा; जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 11:46 AM2021-11-22T11:46:34+5:302021-11-22T12:01:00+5:30

पाहता पाहता आपण वर्षाच्या शेवटच्या महिन्याकडे वाटचाल करत आहोत. हेही वर्ष म्हणावे तसे सर्वांना फळले असे म्हणता येणार नाही. मात्र हळू हळू जनजीवन पूर्वपदावर येत असल्यामुळे आशा पल्लवित होत आहेत. डिसेंबर महिन्याकडे कूच करताना नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा आपल्यासाठी काय घेऊन आला आहे ते जाणून घेऊ.

मुक्त व्यवसाय करणाऱ्यांना एक मोठा प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही हाती घेतलेले काम यशस्वी होऊ शकेल व त्याचे तुम्हाला समाधानदेखील मिळेल. विवाहेच्छुकांना चांगले स्थळ चालून येईल. कुटुंबात मंगल कार्य घडेल. तसेच अन्य काही भेटी गाठींमुळे आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील.

प्रवासासाठी हा आठवडा तुम्हाला अनुकूल ठरेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीपथावर असाल. या आठवड्यात थोडा आर्थिक भार वाढल्याने तुमच्यावर ताण पडू शकतो पण लवकरच स्थिती सुधारेल, निश्चिन्त राहा. बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घ्या.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना हा काळ लाभदायक ठरू शकेल. विवाहेच्छुचे विवाह जुळतील. तुमच्या प्रिय व्यक्तीकडून प्रेम विवाहाबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. या काळात प्रवासाचेही योग आहेत. आरोग्याची तक्रार दूर होईल.

प्रियजनांचा सहवास लाभेल. दूरचे प्रवास होतील. बजेट सांभाळा अन्यथा आर्थिक भार सोसावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी हलगर्जीपणा करू नका. परिस्थिती सांभाळणे कठीण जाईल. आरोग्याची काळजी घ्या.

हा आठवडा तुम्हाला उत्साह प्रदान करेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना तसेच एखादे मोठे प्रोजेक्ट हातळणाऱ्यांना त्यात यश मिळू शकेल. प्रियजनांचा सहवास लाभेल. भावनेच्या भरात अति खर्च टाळा. आरोग्य सांभाळा.

हा काळ तुम्हाला प्रगतीपथावर नेणारा आहे. तुमचा आत्मविश्वास वाढवणारा आहे. या काळात तुमच्या वाट्याला मानसन्मानाचे प्रसंग येतील. घरात मंगल कार्य घडेल. आरोग्य उत्तम राहील.

हा काळ तुम्हाला यश प्रदान करणारा आहे. त्यामुळे या काळाचे सोने करा. आता केलेली मेहनत आगामी वर्षाच्या उत्साहाची नांदी ठरू शकेल. सर्व क्षेत्रात प्रगती पथावर राहाल. आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

या काळात आपण कौटुंबिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच प्रश्न सोडवलेत तर गुंता वाढणार नाही. हा काळ प्रेम, नातेसंबंध सुधारणारा ठरेल. मोठा निर्णय घेताना जाणकारांचे मार्गदर्शन घ्या. फायदा होईल. आरोग्याकडे लक्ष द्या.

तुमच्यापैकी अनेकांच्या वाट्याला येणारे एकाकी पण आता संपण्याचा काळ जवळ आला आहे. आयुष्याचा जोडीदार, वाटाड्या, सखा, मित्र अशा कोणत्याही रूपात तुमची भावनिक गरज शमवणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल. तिला समजून घ्या. नात्यांचा आदर करा आणि प्रकृती सांभाळा.

या राशीसाठी हा काळ सुखाचा आहे. आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील. आरोग्यासाठी घेत असलेली मेहनत परिणामकारक ठरल्याने तुमचा उत्साह वाढेल. जमीन खरेदीचे किंवा स्थलांतराचे योग असल्याने नवीन ठिकाणी जाणे होईल.

व्यावसायिक स्तरावर या आठवड्यात कमाईची उत्तम संधी मिळण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून आजारी असलेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कामाच्या बाबतीत तुम्ही अधिक जागरूक राहाल आणि पूर्वीपेक्षा चांगले परिणाम मिळण्याची चिन्हे आहेत. बालपणीच्या मित्राला भेटून जुन्या आठवणींमध्ये हरवून जाण्याची संधी मिळणार आहे.

व्यावसायिक स्तरावर वाढलेली जबाबदारी हाताळणे थोडे कठीण जाईल. सामाजिक क्षेत्रात तुमच्याबद्दल अनेक गैरसमज पसरले असण्याची शक्यता आहे, ती तुम्ही संभाषणातून दूर करू शकता. प्रेमसंबंधात विसंवाद घडल्यास तुमचे नाते कमकुवत होऊ शकते. काळजी घ्या!