१०० वर्षांनी अद्भूत योग: ‘या’ ६ राशींवर होणार शनिदेव प्रसन्न; भाग्योदय, राजयोगाचे संकेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 03:33 PM2022-05-20T15:33:29+5:302022-05-20T15:44:05+5:30

कर्मफलदाता न्यायाधीश असलेल्या शनिदेवाच्या कृपेने कोणत्या राशींना धनलाभासह नानाविध फायदे मिळू शकतात, तुमची रास कोणती? जाणून घ्या...

आताच्या घडीला शनिदेव आपलेच स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत विराजमान आहेत. जुलै महिन्यात शनी वक्री होऊन मकर राशीत येणार आहेत. त्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये पुन्हा मार्गी चलनाने कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. (Saturn Transit 2022)

एप्रिल महिन्याच्या अखेरीस शनिदेवाने कुंभ राशीत प्रवेश केला. परिणामतः धनु राशीची साडेसाती संपून, मीन राशीची सुरू झाली. तर मकर राशीचा शेवटचा टप्पा आणि कुंभ राशीचा साडेसातीचा मधला टप्पा सुरू झाला. (Shani Dev Gochar 2022)

नवग्रहांमधील न्यायाधीश म्हणून शनिदेवांकडे पाहिले जाते. नियमाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्माचे फळ प्राप्त होत असते.शनीदेव हे कलियुगाचे देवता असून, कर्म फळदाता आहेत, अशी मान्यता आहे. मात्र, १०० वर्षांनी अद्भूत योग जुळून येत असून, याचा ६ राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. (Amazing Yoga after 100 Years)

शनिदेवाच्या राशीबदलाचा सर्वच राशींवर परिणाम होत असतो. काही राशीच्या व्यक्तींवर प्रतिकूल प्रभाव पडू शकतो, तर काही राशीच्या व्यक्तींना हा बदल भाग्योदयकारक आणि राजयोग आणणारा ठरू शकतो, असे ज्योतिषशास्त्रानुसार म्हटले जाते.

कामात अपयश, पैशाला बरकत नसणे मानसिक ताण तणाव दुःख आणि समस्यांचा सामना करावा लागणाऱ्यांना आता इथून पुढे काळ आपल्यासाठी शुभ बनत आहे. शनिदेवाच्या कृपेने आपल्या जीवनात सुख समृद्धीची बहार येण्यास सुरुवात होऊ शकणार आहे. आपल्या जीवनात आनंदाचा काळ येऊ शकणार आहे, असे म्हटले जात आहे.

तसेच उद्योग धंद्यामध्ये प्रगती होऊ शकेल. कार्यक्षेत्रातून भरपूर पैशाची वाढू शकणार आहे. शनिदेवाच्या कृपेने आपल्या करिअर मध्ये निर्माण झालेल्या समस्य दूर होऊ शकणार आहेत आणि त्यायोगे अतिशय सुंदर प्रगती होणार आहे. हाती घेतलेल्या कामांना यश येणार असून, नवीन प्रगतीच्या संधी स्वतःहून चालत आपल्याकडे येऊ शकतात.

आपल्या मानसिक आणि बौद्धिक क्षमतेत सुधारणा घडून येऊ शकतील. कोर्ट-कचेरीतील खटल्यांचा निकाल सकारात्मक ठरू शकेल. तसेच समाजकारण, राजकारण, कला आणि शिक्षा यांसारख्या अनेकविध क्षेत्रात यश संपादन करण्याचे योग जुळून येऊ शकणार आहेत. शत्रूवर विजय प्राप्त होणार असून अशक्य वाटणारी कामेही शक्य होणार आहेत.

शनिदेवाच्या कृपेने आपण प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करणार आहात, तर चला वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.

मेष राशीच्या जातकांच्या आयुष्यातील कठीण काळ संपून शनिदेवाच्या कृपेने सुखाचे दिवस येऊ शकतील. मागील काही काळापासून जाणवत असलेली आर्थिक चणचण आता दूर होणार आहे. उद्योग व्यापारात मनासारखी प्रगती होऊ शकेल. मनावर असलेले चिंतेचे सावट दूर होऊ शकेल. कार्यक्षेत्रात कामगिरी उंचावू शकेल.

वृषभ राशीच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये शनिदेवाच्या कृपेने आनंदामध्ये वाढ होऊ शकेल. धनप्राप्तीच्या अनेक संधी प्राप्त होऊ शकतील. या कालावधीत भागीदारीचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. व्यसनापासून दूर राहून मेहनत करून खूप मोठी प्रगती होऊ शकते. उद्योग क्षेत्रामध्ये आवक वाढू शकेल. समाजात मान-सन्मान, प्रतिष्ठा वृद्धिंगत होऊ शकेल. शनिदेवाच्या कृपेने बिघडलेली कामे आता सुरळीत होऊ शकतील.

कर्क राशीच्या व्यक्तींचे भाग्य शनिदेवाच्या कृपेने भाग्य चमकणार आहे. नशिबाची उत्तम साथ लाभू शकेल. अनुकूल परिस्थिती असल्याने उद्योग व्यापारातून चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे. हाती घेतलेल्या कामना यश प्राप्ती होणार असून, प्रगतीच्या नव्या मार्गाची सुरुवात होणार आहे. मनावरील ताण तणाव दूर होऊन सुख समृद्धीचे दिवस येऊ शकतील.

सिंह राशीचे लोक शनिदेवाच्या कृपेने खूप मोठ्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकतात. नोकरीमध्ये एक मोठे पद मिळण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारामध्ये स्थिती समाधानकारक बनणार असून, योजलेल्या योजना आता सफल होऊ शकतील. मागील काळात राहून गेलेले कामे आता या काळात पूर्णत्वास जाऊ शकेल. प्रगतीमध्ये येणारे अडथळे, समस्या दूर होऊ शकतील.

कन्या राशीच्या व्यक्तींना शुभवार्ता मिळू शकतील. जीवनात भाग्याबरोबर नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे यश, प्रगतीचे मार्ग साध्य होऊ शकतील. कामात येणारे अडथळे दूर होऊ शकतील. एखादा नवीन व्यवसाय सुरु करण्याबाबत योजना आखू शकता. आत्मविश्वासामध्ये भरघोस वाढ होणार असून, उत्साह वृद्धिंगत होऊ शकतो.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींमध्ये शनिदेवाच्या कृपेने भाग्यामध्ये प्रचंड वाढ होणार असून, कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती साध्य करता येऊ शकेल. हा काळ अत्यंत शुभ असल्याने एखादे मोठे यश प्राप्त करू शकाल. आर्थिक आवक वाढू शकेल. धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील. मनामध्ये असणारी भय, भीती दूर होऊन मान-सन्मान वाढू शकेल.

टीप: सदर माहिती ही सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारलेली असून, तुम्हाला शनिदेवाच्या तुमच्यावरील प्रभावाबाबत सखोल माहिती हवी असल्यास तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे अत्यंत उपयुक्त ठरेल, असे सांगितले जात आहे.