२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 18:33 IST
1 / 12नवग्रहांचा गुरू मानला गेलेला बृहस्पती म्हणजेच गुरू ग्रह वक्री चलनाने कर्क राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. पुढील ६ महिने गुरू पुन्हा एकदा मिथुन राशीत विराजमान असेल. डिसेंबर महिन्यात बुध पाच वेळा गोचर करणार आहे. या कालावधीत गुरू आणि बुध यांचा षडाष्टक योग जुळून येत आहे. 2 / 12तसेच याच कालावधीत गुरू आणि बुध यांचा नवमपंचम योग जुळून येत आहे. अनेक राशींना या योगाचा उत्तम लाभ होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. यासह डिसेंबर महिन्यात गुरूचेच स्वामित्व असलेल्या धनु राशीत चतुर्ग्रही योग जुळून येत आहे.3 / 12अवघ्या काही दिवसांनी २०२५ या वर्षाची सांगता होणार असून, नववर्ष २०२६ सुरू होऊ शकेल. अनेक शुभ योग डिसेंबर महिन्यात जुळून येत आहेत. यामुळे २०२५ हे वर्ष संपताना अनेक राशींना याचा चांगला सकारात्मक लाभ होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...4 / 12मेष: षडाष्टक योगाच्या निर्मितीमुळे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या काळात धैर्य आणि शौर्य वाढेल. आत्मविश्वास वाढेल. नवीन अनुभव येतील. यशाचा मार्ग मोकळा होईल. पदोन्नती मिळण्याची, उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. या काळात देशात किंवा परदेशात प्रवास करू शकता. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नियोजित योजना यशस्वी होतील.5 / 12मिथुन: अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात. काळजीपूर्वक नियोजन करून प्रलंबित कामे पूर्ण करू शकता. कारकिर्दीत लक्षणीय फायदे मिळू शकतात. पदोन्नतीसह पगार वाढ मिळू शकते. शिक्षण क्षेत्रात लक्षणीय फायदा होऊ शकतो. कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवू शकता. संवाद कौशल्याद्वारे अनेक क्षेत्रात यश मिळवू शकता. सार्वजनिक आणि व्यावसायिक जीवनात चांगले प्रदर्शन करण्यास मदत होईल. निर्णय घेण्याची क्षमता चांगली असेल.6 / 12कर्क: गुरु आणि बुध ग्रहाचा षडाष्टक युती सकारात्मक ठरू शकतो. या काळात शेअर बाजार आणि लॉटरीमधून फायदा होऊ शकतो. व्यवसायात गुंतवणूक करणाऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना अपेक्षेपेक्षा चांगले निकाल मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना सहकाऱ्यांकडून फायदा होईल. प्रसिद्धी मिळू शकेल. अधिकार वाढेल. जीवनात आनंददायी अनुभव येतील.7 / 12तूळ: अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होईल. अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात यश मिळवण्यात यशस्वी व्हाल. करिअरच्या दृष्टिकोनातून हा काळ अत्यंत अनुकूल असेल. परदेशात नोकरी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी यश आणि प्रतिष्ठा वाढण्याची दाट शक्यता आहे. कठोर परिश्रमाचे निश्चितच योग्य परिणाम मिळतील. हा काळ व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार यशस्वी होऊ शकतो. पैसे कमविण्याच्या अनेक संधी निर्माण होऊ शकतात. 8 / 12वृश्चिक: या काळात आत्मविश्वास वाढेल. लोकप्रिय व्हाल. या काळात आदर आणि प्रतिष्ठा मिळेल. पदोन्नती मिळण्याची आणि उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. आनंदी व्हाल. कामाच्या ठिकाणी परिस्थिती चांगली असेल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहील. भागीदारीतील कामातूनही फायदा होईल.9 / 12मकर: अनेक क्षेत्रात फायदा होऊ शकतो. भागीदारीत चालणारे व्यवसाय मोठ्या प्रमाणात नफा मिळवू शकतात. अविवाहितांसाठी चांगली स्थळे येऊ शकतात. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकता. गुरु अनेक अडचणींवर मात करण्यास मदत करू शकतात. काही जुन्या गुंतागुंतीच्या प्रकरणातून मुक्तता मिळू शकते.10 / 12कुंभ: गुरु आणि बुध ग्रहाचा षडाष्टक योग फायदेशीर ठरू शकतो. कार्यशैली सुधारेल. व्यावसायिक प्रगतीच्या संधी मिळतील. सामाजिक प्रतिष्ठा आणि मान वाढेल. या काळात नवीन संधी निर्माण होतील. घर, वाहन किंवा जमीन खरेदी करू इच्छिणाऱ्यांना अनुकूल परिस्थिती मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम फुलेल. इच्छा पूर्ण होतील.11 / 12मीन: कामात आणि व्यवसायात लक्षणीय प्रगती अनुभवायला मिळेल. नोकरी करणाऱ्यांना कामावर कनिष्ठ आणि वरिष्ठ दोघांकडून पाठिंबा मिळेल. पदोन्नती आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. आनंद मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाची परिस्थिती चांगली असेल. आत्मविश्वासही वाढेल. व्यावसायिकांना लक्षणीय आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसाय वाढू शकतो.12 / 12- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.