११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 19:11 IST2025-06-10T18:57:56+5:302025-06-10T19:11:27+5:30

११ जून २०२५ या दिवशी अनेक शुभ योग जुळून येत आहे. ज्येष्ठ पौर्णिमेला लक्ष्मी देवीसह गणपतीचेही शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकणार आहेत. कोणत्या राशींवर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या...

११ जून २०२५ रोजी ज्येष्ठ पौर्णिमा आहे. यात दिवसापासून ज्येष्ठ महिन्याच्या वद्य पक्षाला प्रारंभ होत आहे. काहीच दिवसांनी संकष्ट चतुर्थीचे व्रत आचरले जाणार आहे. यातच काही ग्रहांच्या गोचरामुळे शुभाशुभ योग जुळून आलेले आहेत. ११ जून रोजी भद्र नामक राजयोग जुळून असल्याचे सांगितले जात आहे.

११ जून २०२५ रोजी चंद्र वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करणार आहे. बुधवार या दिवसावर नवग्रहांचा राजकुमार मानल्या गेलेल्या बुध ग्रहाचा प्रभाव अधिक असतो. तसेच या दिवशी सूर्याची पूर्ण दृष्टी चंद्रावर असणार आहे. ११ जून रोजी ज्येष्ठा नक्षत्र असेल. तर दुपारपर्यंत साध्य योग असणार आहे.

बुधवार, ११ जूनचा दिवस भगवान लक्ष्मी नारायण यांना समर्पित असेल. बुधवारी गणपती पूजनाचे विशेष महत्त्वही आहे. त्यामुळे गणपती आणि लक्ष्मी देवी यांच्या आशीर्वादामुळे अनेक राशींना उत्तमोत्तम लाभ प्राप्त होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...

मेष: नोकरी, व्यवसायात नवनवीन संधी मिळतील. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. मात्र, संयमाने वागण्याची गरज आहे. वाहन जपून चालवा. घाईघाईत कामे उरकण्याचा प्रयत्न करू नका. परिस्थिती आटोक्यात येईल. सामाजिक मान-सन्मान प्राप्त होईल. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. मौजमजा करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च कराल.

वृषभ: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. नोकरीत नियमानुसार कामे करा. सहकारी वर्गाशी जुळवून घ्यावे. काही अडचणी असतील. चंद्र भ्रमणामुळे चांगली फळे मिळतील. मात्र, मोहात अडकू नका. गुरुवार, शुक्रवार थोडे सावध राहा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. अचाट साहस करण्याच्या फंदात पड्डू नका. शनिवारी चांगली बातमी कळेल.

मिथुन: काही कटु, तर काही गोड अनुभव येतील. नवीन प्रस्ताव येतील. ते स्वीकारून कामांचे नियोजन करा. एखाद्या वेगळ्याच उपक्रमात व्यस्त व्हाल. त्यामुळे महत्त्वाची कामे रेंगाळत पडतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. गुरुवार, शुक्रवार अनुकूलता अनुभवायला मिळेल. जीवनसाथीशी सूर जुळतील. व्यवसायात भरभराट होईल. आर्थिक आवक चांगली राहू शकेल.

कर्क: अनुकूल फळे मिळतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. नोकरीत नवीन संधी मिळेल. पदोन्नती, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. वरिष्ठांकडून कामाची प्रशंसा केली जाईल. आरोग्याची काळजी घ्यावी. फार दगदग होईल, अशी कामे करू नका.

सिंह: विविध आघाड्यांवर सफलता मिळेल. व्यवसायात भरभराट होईल. हाती पैसा खेळता राहील. नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात रस राहील. गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घ्या. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. नोकरीत अनपेक्षितपणे मोठी संधी मिळेल. वरिष्ठांकडून कामाची प्रशंसा केली जाईल. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. मुलांशी संवाद राहील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील.

कन्या: चंद्राचे भ्रमण शुभ फळे देणारे ठरेल. उत्साह वाढेल. धनलक्ष्मीची कृपा राहील. मालमत्तेच्या कामात सफलता मिळेल. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. त्यानिमित्ताने जवळच्या लोकांच्या व नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. घरात मिठाई आणली जाईल. समाजात मान वाढेल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल.

तूळ: ग्रहमानाची अनुकूलता बाजूने राहील. अडचणी दूर होतील. मनात प्रसन्न विचार राहतील. नवीन संधी चालून येतील. कल्पक विचारांना चालना मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. व्यवसायात भरभराट होईल. सतत व्यस्त राहाल. गुरुवार, शुक्रवार मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. नोकरीत एखादी नवीन जबाबदारी मिळेल.

वृश्चिक: काही अडचणी असतील. एखाद्या कामात व्यस्त राहाल. थोडी धावपळ करावी लागू शकते. नोकरीत वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. बरेच परिश्रम करावे लागतील. घरातील लोकांची मने दुखावली जाणार नाहीत याची काळजी घ्या. क्रोधाला आवर घातला पाहिजे. धनलाभ होईल. खाण्यापिण्याची चंगळ राहील.

धनु: अनुकूल ग्रहमानाचा फायदा घ्यावा. आर्थिक प्राप्ती होईल. पैसा खर्च करण्याकडे कल राहील. खर्चाच्या बाबतीत थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. किरकोळ स्वरूपाच्या अडचणी येतील. सबुरीने वागा. ठरवाल ते तडीस न्याल. जोडीदार मर्जीनुसार वागेल. नवीन लोकांच्या ओळखी होतील. फायदे होतील.

मकर: अनुकूलता अनुभवायला मिळेल. एखाद्या चांगल्या बातमीमुळे मन आनंदून जाईल. नोकरीत पदोन्नती, पगारवाढ, सोयी-सुविधांत वाढ, मान-सन्मान, अशी फळे मिळतील. घरात उत्सवी वातावरण राहील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. मित्र-मैत्रिणींच्या भेटी होतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. एखादे महत्त्वाचे काम मार्गी लागेल.

कुंभ: एखादी चांगली बातमी कळेल. मुलांचे कौतुक होईल. समाजात मान वाढेल. थोरा मोठ्यांच्या ओळखीचा फायदा होईल. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. नोकरीत महत्त्व वाढेल, धनलक्ष्मीची कृपा राहील. घरी पाहुणे मंडळी येतील. महत्त्वाची कामे आटोपून घ्या. दगदग करू नका.

मीन: आगामी दिवस प्रगतीला पूरक राहतील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. भाग्याची चांगली साथ मिळेल. अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेले एखादे महत्त्वाचे काम होईल. उत्साहाला उधाण येईल. सामाजिक मान-सन्मान मिळेल. नोकरीत मनासारखे होईल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.