Astrology: आज सर्वार्थ सिद्धी योग; हनुमान कृपेने 'या' ५ राशींना मिळणार धन, यश आणि मोठी संधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 11:11 IST2025-12-09T11:05:36+5:302025-12-09T11:11:09+5:30

Astrology: आज ९ डिसेंबर रोजी 'सर्वार्थ सिद्धी योग' जुळून येत आहे. हा योग सर्व कामे सिद्धीस नेणारा मानला जातो. मंगळवार हा दिवस हनुमानाला समर्पित असल्याने, या योगामध्ये हनुमानाची कृपा खास करून काही राशींवर विशेष प्रमाणात राहील, ज्यामुळे त्यांना धन, यश आणि करिअरमध्ये मोठे लाभ मिळतील.

मंगळवार हा गणेशाचा आणि हनुमानाचाही! त्यातच सर्वार्थ सिद्धी योग आणि संकट मोचक हनुमान तसेच सिद्धिविनायकाचा आशीर्वाद यामुळे हाती घेतलेल्या कामाला गती मिळेल, यश मिळेल असे सांगितले जात आहे. त्याचा लाभ पुढील राशींना होऊ शकेल.

१. मेष (Aries) : हनुमानाच्या कृपेमुळे मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस उत्तम संधी घेऊन येत आहे. तुमचे अडकून पडलेले महत्त्वाचे सरकारी किंवा कायदेशीर काम आज नक्कीच मार्गी लागेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची नोंद घेतली जाईल आणि वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. आर्थिक बाजू मजबूत राहील आणि गुंतवणुकीतून चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्या ऊर्जेचा योग्य वापर केल्यास, यशाचे दरवाजे आज उघडतील.

२. वृश्चिक (Scorpio) : वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी सर्वार्थ सिद्धी योग अत्यंत फलदायी ठरणार आहे. विशेषतः व्यावसायिक लोकांना आज मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. जर तुम्ही नवीन करार (Deal) करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी हा दिवस शुभ आहे. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि जुन्या समस्यांवर तोडगा निघेल. कुटुंबासोबतचे संबंध मधुर राहतील आणि सुख-समृद्धी वाढेल.

३. धनु (Sagittarius) : धनु राशीच्या लोकांच्या भाग्यात आज मोठा बदल होण्याची शक्यता आहे. विशेषतः, परदेशाशी संबंधित किंवा शिक्षणाशी संबंधित कामांमध्ये आज यश मिळेल. करिअरमध्ये प्रगतीसाठी उत्तम योग आहेत; तुम्हाला नवीन जबाबदारी मिळू शकते. तुमचे आरोग्य चांगले राहील आणि मनात सकारात्मकता टिकून राहील. हनुमानाचा आशीर्वाद मिळाल्याने तुम्हाला आर्थिक लाभ होईल.

४. मकर (Capricorn) : मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस धनवृद्धीचा संकेत देत आहे. तुमचे जे पैसे अडकले होते किंवा कर्ज स्वरूपात दिले होते, ते आज परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत बदल किंवा पदोन्नतीचे संकेत मिळत आहेत. गुंतवणुकीचे नियोजन करण्यासाठी आणि दीर्घकालीन ध्येये निश्चित करण्यासाठी हा दिवस शुभ आहे. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

५. कुंभ (Aquarius) : कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस इच्छापूर्तीचा आहे. सर्वार्थ सिद्धी योगामुळे तुम्ही जे काम हाती घ्याल, त्यात निश्चित यश मिळेल. कुटुंबासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात. नवीन स्रोतांकडून उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. आज हनुमानजींचे दर्शन घेऊन तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम सुरू केल्यास, त्यात मोठा फायदा होईल.

हनुमानकृपेचे उपाय : मंगळवारी दिवसभरात हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडचे पठण करा. हनुमान मंदिरात जाऊन तिळाचे तेल, रुईच्या पानाफुलांचा हार अर्पण करा. गरजू व्यक्तींना गूळ, चणे किंवा लाल फळे दान करा.