मे महिन्यात अनेक राजयोग: ‘या’ ४ राशींच्या व्यक्ती खूपच लकी; धनलाभासह फायदेशीर काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 12:36 PM2022-05-06T12:36:55+5:302022-05-06T12:41:04+5:30

ज्योतिषशास्त्रानुसार, एकूण ३२ प्रकारचे राजयोग असल्याचे सांगितले जाते. जाणून घ्या...

एप्रिल महिन्याप्रमाणे मे महिनाही ज्योतिषीय दृष्टिकोनातून विचार केल्यास महत्त्वाचा असल्याचे सांगितले जात आहे. या महिन्यात नवग्रहांपैकी महत्त्वाचे मानले जाणारे ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत. यापैकी बुध ग्रह वक्री होणार आहे. (Rajyog In May 2022)

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या या स्थानबदलामुळे मे महिन्यात अनेक राजयोग जुळून येत आहेत. या राजयोगाचा सकारात्मक आणि उत्तम प्रभाव काही राशींवर पडणार असल्याचे सांगितले जात आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, एकूण ३२ प्रकारचे राजयोग असतात. या राजयोगांमुळे काहींची आर्थिक स्थिती, सुख-समृद्धी, सौख्य यांमध्ये अनेकपटीने वाढ होऊ शकते. क्वचितप्रसंगी रंकाचा राजाही होऊ शकतो, असे सांगितले जाते.

मे महिन्यात कोणत्या राशीच्या व्यक्तींना प्रबळ राजयोग जुळून येऊ शकतात. या राशी अतिशय लकी मानल्या जात असून, या राशीच्या व्यक्तींना नाना प्रकारचे लाभ, धनलाभाचे उत्तम योग जुळून येऊ शकतात, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...

मे महिन्यात तूळ राशीच्या व्यक्तींना राजयोगाचे योग प्रबळ असल्याचे सांगितले जात आहे. या कालावधीत करिअरमध्ये शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतील. आपण घेत असलेल्या मेहनतीचे फळ या काळात मिळू शकेल. आर्थिक लाभ होऊ शकतील. व्यापार, व्यवसायात असलेल्यांना अनेकविध लाभ, फायदे प्राप्त होऊ शकतील.

मे महिन्यात मकर राशीच्या व्यक्तींना राजयोगाचे प्रबळ योग जुळून येऊ शकतात. यामुळे या राशीच्या व्यक्तींचे नशीब चमकू शकते. नोकरीच्या शोधात असलेल्यांना शुभवार्ता मिळू शकतील. कार्यालयातील वरिष्ठ आपल्या कामाचे कौतुक करतील. पदोन्नतीचे योग जुळून येऊ शकतील. एखादी मनोकामना पूर्णत्वास जाऊ शकेल. परदेशवारीचे योगही जुळून येऊ शकतात. अपार लाभ होऊ शकतील.

मे महिन्यात कुंभ राशीच्या व्यक्तींना राजयोगाचे प्रबळ योग जुळून येऊ शकतात. करिअर, व्यवसाय यामध्ये शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतील. परदेशात जाऊन नोकरी करू इच्छिणाऱ्यांना सुवर्ण संधी प्राप्त होऊ शकतील. नोकरदारवर्गाला पदोन्नती मिळू शकेल. नव्या नोकरीच्या चांगल्या संधी प्राप्त होऊ शकतील. व्यापारी वर्गाला अपार लाभ मिळू शकतील.

मे महिन्यात मीन राशीच्या व्यक्तींना राजयोगाचे प्रबळ योग जुळून येऊ शकतात, असे सांगितले जात आहे. या राशीच्या व्यक्तींना विशेष शुभलाभ मिळू शकतील. हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळू शकेल. आपण घेत असलेल्या कठोर मेहनतीचे फळ या कालावधीत प्राप्त होऊ शकेल. कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संबंध सुधारतील. पदोन्नतीचे योग जुळून येऊ शकतील. मे महिन्यात अनेक शुभवार्ता मिळू शकतील. व्यापार, व्यवसायिकांना धनलाभासह फायदेशीर काळ ठरू शकेल.

मे महिन्यात अनेकविध सण-उत्सवांचीही रेलचेल असून, सन २०२२ मधील पहिले चंद्रग्रहण होणार आहे. सदर माहिती ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, योग्य सल्ल्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे उपयुक्त ठरू शकेल.