लिपस्टिक ऑनलाईन खरेदी करायचीय?, मग 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 12:56 PM2020-02-11T12:56:21+5:302020-02-11T13:11:50+5:30

मेकअप करायला मुलींना जास्त आवडतं. सध्या मुलींमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या लिपस्टिक फार लोकप्रिय असून सर्वात जास्त यूज होणाऱ्या मेकअप प्रोडक्ट्समध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. ज्यांना मेकअप करण्याची हौस असेल त्यांच्या बॅगमध्ये किमान एक तरी लिपस्टिक नक्की मिळेल.

आजचा जमाना हा ऑनलाईनचा असल्याने दुकानात जाऊन वस्तू खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन खरेदी करण्याकडे अनेकांचा कल हा अधिक असतो. ऑनलाईन लिपस्टिक खरेदी करायची असेल तर काही गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

गुगलवर 'buy lipstick online' असं लिहून सर्च केल्यानंतर अनेक वेबसाईट्सचे पर्याय दिसतात. तसेच महिलांना आकर्षित करण्यासाठी भन्नाट ऑफर्स दिल्या जातात. मात्र ऑनलाईन लिपस्टिक खरेदी करताना योग्य वेबसाईट निवडा. त्याबाबत आधी नीट सर्च करून माहिती मिळवा.

बाजारात सध्या विविध रंगांच्या लिपस्टिक उपलब्ध आहेत. लिपस्टिकच्या शेडचा वेगवेगळा कोड असतो. त्यामुळे जर आवडत्या शेडची लिपस्टिक ऑर्डर करायची असेल तर त्याचा कोड लक्षात ठेवा.

लिपस्टिक सिलेक्ट करताना त्याचा रिव्ह्यू वाचणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यामुळे प्रोडक्टची क्वालिटी आणि डिलिव्हरी स्टँडर्डची माहिती मिळते.

लिपस्टिकची देखील एक साईज असते. ब्रँडेड लिपस्टिकवर त्याचं वजन लिहिण्यात आलेलं असतं. त्यामुळे फक्त ऑनलाईन फोटो पाहून लिपस्टिक निवडू नका.

बाजारात अनेक फेक वस्तू देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे ओरीजनल वेबसाईटवरून ऑनलाईन लिपस्टिक ऑर्डर करणं उत्तम आहे.

लिपस्टिकची एक्सपायरी डेट पाहा. ऑर्डर करताना प्रोडक्ट डिटेल्समध्ये एक्सपायर डेटबाबतची माहिती देण्यात आलेली असते. तसेच एक लिपस्टिक साधारण किती दिवस वापरता यानुसार ती घेताना विचार करा.