केसांसाठी अत्यंत उपयोगी ठरतो लसूण; कोंडाही करतो दूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 05:23 PM2019-01-14T17:23:07+5:302019-01-14T17:32:20+5:30

लसूण फक्त जेवणाची चव वाढविण्यासाठीच नाही तर त्यातील औषधी गुणधर्मांसाठीही ओळखला जातो. अनेक गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी लसणाचा उपयोग होतो. पण तुम्हाला माहीत आहे का? लसूण केसांसाठीही फायदेशीर ठरतो. लसणामुळे फक्त केसांची वाढच होत नाही तर केसांमध्ये कोड्यांची समस्या असेल तर तीदेखील दूर होते.

लसणामध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. ज्यामध्ये बी-6, सी आणि मॅगनीजसुद्धा समाविष्ट असतात. ही सर्व तत्व हेल्दी केसांसाठी अत्यंत आवश्यक असतात.

लसणामध्ये अॅन्टीमायक्रोबियल आणि अ‍ॅन्टीफंगल प्रॉपर्टीज असतात. ज्या केसांमधील बॅक्टेरिया आणि इतर किटकांपासून लढण्यासाठी मदत करतात. तसेच डोक्याची त्वचा म्हणजेच स्काल्प हेल्दी ठेवण्यासाठीही हे गुणधर्म मदत करतात.

लसूण हेयर फॉलिकल्सला स्वच्छ करण्यासाठीही मदत करतो आणि केसांच्या मजबुतीसाठीही मदत करतो. ज्यामुळे केस गळण्याचं प्रमाण कमी होतं.

केसांसाठी लसणाचा वापर करत असाल तर एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक असतं. जर तुमची त्वचा सेंसिटिव्ह असेल. तर लसणाचा वापर केसांसाठी किंवा त्वचेसाठी करू नका. वापर करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या.