खरचं, सनबर्नमुळे ऑयली होते स्किन?; जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 01:11 PM2019-06-01T13:11:45+5:302019-06-01T13:19:46+5:30

उन्हाळ्यामध्ये सर्वांना सतावणारी कॉमन समस्या म्हणजे, सनटॅनिंग. जर तुमची स्किन ऑयली असेल तर टॅनिंगमुळे आणखी खराब होऊ शकते. खरं तर सनबर्नमुळे स्किन काही वेळासाठी ड्राय होते. त्यामुळे लोकांना वाटतं की, त्यांचा ऑयली स्किनचा त्रास आता कमी होईल. पण असं सूर्याच्या प्रखर आणि नुकसान पोहोचवणाऱ्या किरणांमुळे होतं

सनबर्ननंतर त्वचेमध्ये असलेल्या तेलीय ग्रंथीमधून आणखी तेल निघतं, ज्यामुळे स्किन आणखी जास्त ऑयली दिसू लागते.

सनबर्नपासून बचाव करण्याचा सर्वात उत्तम उपाय म्हणजे, उन्हामध्ये बाहेर पडण्याआधी चांगल्या कंपनीचं सनस्क्रिन लावा.

सनबर्न झाल्यानंतर त्वचा थंड पाण्याने धुवून त्यावर कोरफडीचा गर लावा.

सनबर्नवर बटाट्याचा रस आणि ओटमील पॅकही फायदेशीर ठरतो.

ग्रीन टीचाही वापर तुम्ही सनबर्नवर करू शकता. त्यासाठी एक कप पाण्यामध्ये ग्रीन टी बॅग काही वेळासाठी टाकून ठेवा. यामध्ये एक कपडा बुडवून हे पाणी सनबर्न झालेल्या ठिकाणी लावा.

सनबर्नसोबतच डिहायड्रेशनही होऊ शकतं. त्यामुळे पाणी प्या.

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.