त्वचेवरचा सावळेपणा वाढत चालला असेल तर 'या' गोष्टींचे सेवन करा बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 05:41 PM2020-01-23T17:41:59+5:302020-01-23T17:54:57+5:30

गोरी- चमकदार त्वचा सगळ्यांनाच हवी असते. कारण तर त्वचेची योग्यप्रकारे काळजी घेतली नाहीतर अनेकदा होणारं नुकसान भरून काढणं खूप कठिण होऊन बसतं. जर तुम्ही तुमच्या त्वचेची व्यवस्थित काळजी घेऊन सुद्धा त्वचा काळी पडत असेल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणं गरचेचं आहे.

अनेकदा तुम्ही खाण्यापिण्यात समावेश करत असलेल्या पदार्थांमुळे तुमच्या त्वचेवरचं तेज नाहीसं होऊन त्वचा सावळी पडू शकते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या पदार्थांचे सेवन केल्यास तुमची त्वचा काळी पडू शकते.

संत्र्याच्या रसात फायबरर्स नसतात. त्यामुळे ब्लड सर्क्यूलेशन कमी होऊन त्वचा काळी पडू शकते. त्यामुळे संत्र्याच्या रसाचे अतिसेवन करणं टाळा.

अनेकांना ब्राऊन ब्रेडच्या तुलनेत व्हाईट ब्रेड खायला जास्त आवडत असतं. पण व्हाईट ब्रेडमुळे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते आणि त्वचेचा रंग ,सावळा पडतो.

जास्त तिखट पदार्थांचा आहारात समावेश केल्यामुळे स्किन काळपट दिसायला सुरूवात होते.

कॉफि किंवा चहाचे अतिसेवन करणं हे त्वचेचा रंग काळा पडण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. दिवसभरात जर तुम्ही एका कपापेक्षा जास्त चहाचे सेवन केले तर स्ट्रेस हार्मोन कार्टिसोलचे प्रमाण वाढते. त्यामुळे स्किन डार्क दिसायला लागते.

साखरेचं अतिसेवन केल्यामुळे तुमच्या त्वचेवरचं तेज नाहिसं होऊ शकतं. त्यामुले रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे त्वचेचे सेल्स डॅमेज होण्याची शक्यता असते.