महागडे क्रीम विसरा, टोमॅटोच्या पेस्टने चेहरा उजळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 02:49 PM2018-05-02T14:49:40+5:302018-05-02T14:49:40+5:30

चेहऱ्यावरील मोठी छिद्र कमी करण्यासाठी टॉमेटोचा लेप लावावा.

मुरुमं कमी करण्यासाठी टॉमेटोची पेस्ट चेहऱ्यावर लावावी, 20 मिनिटांपर्यंत हा लेप ठेवावा. यानंतर थंड पाण्यानं चेहरा धुवून टाकावा.

तेलकट त्वचेसाठी टॉमेटोमध्ये लिंबू मिसळून त्याचा लेप 20 मिनिटांपर्यंत ठेवावा. काही दिवसांनी चेहरादेखील उजळतो.

सन टॅनिंग झाल्यास टॉमेटो, दही आणि ओटमिलची पेस्ट करुन लावावी. आठवड्यातून दोनदा हा प्रयोग करावा.

चेहरा उजळवण्यासाठी टॉमेटो, गुलाब पाणी आणि चंदन पावडर एकत्रितरित्या पेस्ट करुन चेहऱ्यावर लावावी.