केसांना कलर करताय? 'या' गोष्टींची काळजी घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 12:10 PM2018-10-27T12:10:01+5:302018-10-27T12:20:50+5:30

डोक्यावरचे सफेद केस लपवण्यासाठी अनेकदा बाजारामध्ये मिळणाऱ्या हेअर कलरचा वापर करण्यात येतो. परंतु हाच हेअर कलर केसांसाठी हानिकारक ठरतोच पण त्याचबरोबर तो शरीरासाठीही हानिकारक ठरतो. जाणून घेऊयात हेअर कलर बाबतच्या अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे.

केसांना कलर करताना नेहमी आपण त्यामुळे होणाऱ्या परिणामांकडे दुर्लक्ष करतो. या कलरमध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकल्स असतात. जे स्किनसाठी आणि केसांसाठी घातक ठरू शकतात. एका संशोधनातून असंही सिद्ध झालं आहे की, या हेअर कलरमध्ये असलेल्या केमिकल्समुळे कॅन्सर होण्याचाही धोका असतो.

केसांना कलर केल्यामुळे अनेकदा इन्फेक्शन किंवा अॅलर्जी होते. त्यामुळे स्किनवर रॅशेज येतात. अनेकदा ही अॅलर्जी आरोग्यासाठी घातकही ठरू शकते.

हेअर डाय किंवा हेअर कलरमध्ये असलेल्या पर्सुल्फेटमुळे श्वसनासंबंधीचे आजारही होऊ शकतात.

केसांना कलर करणं डोळ्यांसाठीही घातक ठरू शकतं. केसांना कलर करताना अनेकदा चुकून तो कलर डोळ्यात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे डोळ्यांना इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.

हेअर कलरमध्ये अस्तित्त्वात असलेले केमिकल्स आपल्या आरोग्यासाठी फार घातक ठरतात. चुकूनही चेहऱ्यावर लागले तर त्यामुळे चेहऱ्याला इनफेक्शन होऊ शकतं.