कोळी चावल्याने त्वचेचं होतं गंभीर नुकसान, करा हे घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 11:59 AM2018-11-19T11:59:10+5:302018-11-19T12:07:03+5:30

कोळी हा किटक सर्रासपणे प्रत्येक घरात दिसतो. अनेकांना कोळी चावल्याचा अनुभवही आला असेल. पण कोळी चावणे ही सामान्य बाब नाहीये, कारण कोळीच्या चाव्याने त्वचेवर लाल चट्टे पडू शकतात. यातील महत्त्वाची बाब म्हणजे कोळी चावल्याचे अनेकदा कळती नाही आणि मग त्वचेला झालेली इजा किंवा नुकसान कशामुळे झालं याचा प्रश्न पडतो. पण कोळी चावल्यावर जळजळ होण्यासोबतच त्वचेवर खाजही येते. चेहऱ्यावर जर कोळीने चावा घेतला तर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. इतकंच काय तर वेळीच यावर उपचार केले नाही तर याचे गंभीर परिणामही भोगावे लागू शकतात. त्यामुळे यावर काही घरगुती आणि वेळेत करता येणारे उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बर्फ - कोळी चावल्यानंतर सर्वातआधी ती जागा स्वच्छ पाण्याने आणि साबणाने धुवावी. जर जळजळ जास्त होत असेल किंवा त्वचा लाल होत असेल तर त्यावर बर्फाचा तुकडा ठेवा. १० मिनिटे त्या जागेवर बर्फ लावून ठेवल्यास फायदा होईल.

बेकिंग सोडा - बेकिंग सोडा जळजळ कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. कोळी चावल्यानंतर बेकिंग सोडा पाण्यात मिश्रत करुन पेस्ट तयार करा. ही पेस्ट कोळी चावलेल्या जागेवर काही वेळासाठी लावून ठेवा.

कोरफड - कोरफडीमुळे सूज आणि खाज कमी होण्यास मदत मिळते. यात अॅंटीइफ्लेमेटरी गुण असतात जे सूज दूर करण्यासाठी फायदेशीर असते. याचा फायदा करुन घेण्यासाठी कोरफड दिवसात काही वेळा लावा.

लॅवेंडर ऑइल - कोळ्याच्या चाव्यामुळे होणारी सूज आणि वेदना दूर करण्यासाठी लॅवेंडर ऑइलचा वापर फायदेशीर ठरतो. याचा वापर करण्यासाठी लॅवेंडर ऑइलचे काही थेंड खोबऱ्याच्या तेलात मिश्रित करुन कोळ्याने चावा घेतलेल्या जागेवर लावा.

अॅक्टिवेटिड चारकोल - चारकोल(एकप्रकारचा कोळसा) विषारी पदार्थ काढण्याचे गुण असतात. कोळ्याने चावा घेतलेल्या जागेवर चारकोल पेस्ट लावा. ही पेस्ट १ तासांसाठी तशीच ठेवा. याने त्वचेवर आलेली पुरळ लगेच दूर होईल.