निस्तेज झालेल्या त्वचेसाठी घरीच तयार करा हर्बल क्लिंजर!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 06:44 PM2018-11-24T18:44:08+5:302018-11-24T18:48:45+5:30

सुंदर, तरूण आणि आकर्षक दिसण्यासाठी त्वचेची काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं. अनेक व्यक्ती अशा आहेत ज्या त्वचेवर कोणतंही एक्सपरिमेंट करण्यापासून स्वतःचा बचाव करतात. पण काय तुम्हाला माहीत आहे? बाजारात मिळणाऱ्या ब्युटी प्रोडक्ट्समध्ये अनेक घातक केमिकल्स असतात. ज्यामुळे त्वचा आकर्षक बनण्याऐवजी कोरडी आणि निस्तेज होते. तुम्ही या केमिकलयुक्त क्लिंजरऐवजी घरी तयार करण्यात आलेले होममेड क्लिंजर वापरू शकता.

दही - मिक्सरच्या सहाय्याने 1 चमचा दही आणि अर्धा काकडीचा तुकडा बारिक करून पेस्ट तयार करा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून तयार पेस्टने मसाज करा. 15 मिनिटांनी चेहरा स्वच्छ करून घ्या. या घरगुती क्लिंजरने चेहरा स्वच्छ होण्यासोबतच चेहरा उजळण्यास मदत होईल.

मध आणि लिंबू - मध आणि लिंबाचा रस एकत्र करून हातांच्या सहाय्याने चेहऱ्यावर लावा. 10 ते 15 मिनिटं ठेवून कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

ओट्स - अर्धा लीटर पाणी किंवा दुधामध्ये अर्धा तासासाठी एक कप ओट्स उकळून घ्या. आता तयार लिक्विड गाळून कॉटन बॉल्सच्या मदतीने चेहरा आणि मानेवर लावा. 10 ते 15 मिनिटांनी मसाज करत चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करा. यामुळे त्वचा उजळण्यासोबतच त्वचेवरील इन्फेक्शन दूर होण्यासही मदत होईल.

बदाम - एक मुठभर बदाम बारिक करून दूध आणि लिंबाचा रस एकत्र करून पेस्ट तयार करा. त्यानंतर चेहरा आणि मानेवर तयार पेस्ट लावा. 15 ते 20 मिनिटांनंतर हलक्या हाताने मसाज करत कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. हे मिश्रण त्वचेवरील घाण स्वच्छ करण्यास फायदेशीर ठरतं.