दिसायचंय चिरतरुण?; मग 'या' पदार्थांपासून राहा सदैव दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 03:57 PM2020-02-19T15:57:24+5:302020-02-19T16:01:03+5:30

आपण कायम तरुण दिसावं असं सगळ्यांनाच वाटतं. आपल्याकडे पाहून कोणालाही आपलं वय कळू नये, असं वाटणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र त्यासाठी तुम्ही खाण्यावर नियंत्रण ठेवायला हवं.

मार्जरिन- काही जण मस्क्याला पर्याय म्हणून मार्जरिन खातात. त्यात ट्रान्स फॅट असतं. यामुळे शरीरातल्या हायड्रेशनचं प्रमाण बिघडतं. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकत्या पडू लागतात.

पॅक्ड फूड- धकाधकीच्या जीवनात अनेकदा हातात पुरेसा वेळ नसतो. त्यामुळे दैनंदिन जीवनात पॅक्ड फूडचं प्रमाण वाढतं. त्यात तेलाचं आणि मिठाचं प्रमाण जास्त असतं. त्याचा शरीरावर विपरित परिणाम होतो.

मीठ- अनेकजण जास्त मीठ खातात. यामुळे रक्तदाब वाढतो आणि शरीरावर प्रतिकूल परिणाम दिसू लागतात.

एनर्जी ड्रिंक- काही जण दिवसातून अनेकदा एनर्जी ड्रिंक घेतात. एनर्जी ड्रिंकमध्ये साखर, कॅफेन, सोडियमचं प्रमाण जास्त असतं. त्याचा परिणाम शरीरावर होतो.

गोड पदार्थ- गोड पदार्थांमुळे वजन वाढतं. शरीराची वाटचाल वेगानं वृद्धत्वाच्या दिशेनं सुरू होते.

ब्रेड, पास्ता- अनेकांना ब्रेड, पास्ता यासारखे पदार्थ आवडतात. यामुळे शरीरातल्या साखरेचं प्रमाण वेगानं वाढतं. जास्त मैदा खाल्ल्यास चेहऱ्यावर सुरकत्या पडू लागतात. त्यामुळे मैद्यापासून तयार करण्यात आलेल्या ब्रेडऐवजी गव्हाच्या ब्रेडचा वापर करावा.