नॅचरल ग्लो मिळवण्यासाठी 'या' 10 हर्बल ब्युटी टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 03:05 PM2019-07-26T15:05:45+5:302019-07-26T15:18:42+5:30

कच्च्या दूधामध्ये खोबऱ्याचं तेल एकत्र करून कॉटन बॉलच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. 2 ते 3 मिनिटांसाठी तसचं ठेवा आणि त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या. यामुळे तुमची स्किन हायड्रेट होण्यासोबतच मुलायम होण्यास मदत होते.

स्किन डल दिसत असेल तर काकडीच्या रसामध्ये मीठ एकत्र करून चेहऱ्यावर स्क्रब करा. 2 ते 3 मिनिटं मसाज करा आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचेच्या मृत पेशी दूर होण्यास मदत होते आणि चेहऱ्याला नॅचरल ग्लो मिळतो.

गव्हाच्या पिठामध्ये बदामाच्या तेलाचे काही थेंब आणि गुलाब पाणी एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. थोडं सुकल्यानंतर आपल्या हातांनी पाणी लावून स्क्रब करत चेहऱ्यावरून पेस्ट काढून घ्या. यामुळे तुम्हाला सॉफ्ट स्किनसोबतच फेशिअल हेअर्सपासूनही सुटका होईल.

लिंबाच्या रसामध्ये हळद एकत्र करून चेहऱ्यावर लावा. यामुळे पिंपल्स आणि डाग दूर होण्यास मदत होते. लिंबामध्ये स्किन लाइट करणारे गुणधर्म असतात. तसेच हळदीमधील इन्फ्लामेटरी, अॅन्टी बॅक्टेरिअल आणि अॅन्टीसेफ्टिक गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर ठरतात.

टोमॅटो किसून त्यामध्ये गुळ आणि गुलाब पाणी एकत्र करा. हे स्क्रब स्किनसाठी अत्यंत उपयोगी ठरतं. तयार स्क्रबने 3 ते 4 मिनिटं चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे स्किन टोन लाइट होण्यासोबतच नॅचरल ग्लो मिळण्यासाठीही मदत होईल.

चंदनाच्या पावडरमध्ये मध आणि गुलाब पाणी एकत्र करून फेस पॅक तयार करून चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर थंड पाण्यावे चेहरा स्वच्छ धुवून घ्या. लगेचच तुम्हाला फरक जाणवेल.

डाळिंबाच्या ज्यूसमध्ये काकडीचा रस एकत्र करून तो कॉटन बॉलच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. तुम्ही हे मिश्रण मानेचा काळपटपणा दूर करण्यासाठीही वापरू शकता. लावल्यानंतर 2 ते 3 मिनिटांसाठी तसचं ठेवा आणि त्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका.

टोमॅटोच्या रसामध्ये ग्लिसरीन आणि चंदनाची पावडर एकत्र करून घ्या. तयार मिश्रण कॉटन बॉलच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. काही वेळासाठी तसचं ठेवा आणि त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

मुलतानी मातीमध्ये कोरफडीचा गर एकत्र करून लावल्याने पिंपल्स, डाग, टॅनिंग, स्किन ग्लो आणि ड्राय स्किनपासून सुटका करण्यासाठी मदत होते. या दोन्ही गोष्टी त्वचेच्या अनेक समस्या दूर करतात.

जर तुमची स्किन जास्त ऑयली होत असते, तर ग्रीन टीमध्ये कोरफडीचा गर एकत्र करून चेहऱ्यावर लावा. हे त्वचेवरील एक्स्ट्रा ऑइल दूर करतं तसेच ऑइल कंट्रोल करण्यासाठीही मदत करतं.

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.