82 वी सिनियर नॅशनल बॅडमिंटन स्पर्धा- सिंधू, सायना, श्रीकांत उपांत्य फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 10:56 AM2017-11-07T10:56:07+5:302017-11-07T10:59:57+5:30

पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांनी सोमवारी 82 व्या सिनियर नॅशनल बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

सिंधूने मध्य प्रदेशची प्रतिभावान खेळाडू श्रेयांशी परदेसीचा २१-११, २१-१७ ने पराभव केला.

किदाम्बी श्रीकांतने उपांत्यपूर्व लढतीत शुभम प्रजापतीचे आव्हान २९ मिनिटांच्या खेळात २१-१७, २३-२१ असे मोडीत काढून उपांत्य फेरीत धडक दिली.

सायनाने जी. वृषालीविरुद्धची लढत २७ मिनिटांत २१-१२, २१-१० अशी सरळ गेममध्ये जिंकली.