८२ व्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारी सायना नेहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 06:44 PM2017-11-09T18:44:04+5:302017-11-09T18:46:52+5:30

ऑलिम्पिक कांस्यविजेती आणि विश्वक्रमवारीत ११ व्या स्थानावर असलेली ‘फुलराणी’ सायना नेहवालने रिओ ऑलिम्पिकच्या रौप्यविजेत्या पी. व्ही. सिंधूचा पराभव केला.

२८ वर्षीय सायनाने २१ वर्षीय सिंधूला ५३ मिनिटांत २१-१७, २७-२५ ने पराभूत करीत २००७ नंतर तिसरे राष्ट्रीय विजेतेपद संपादन केले.

सायना- सिंधू सामन्याबद्दल प्रचंड उत्कंठा होती. उभय खेळाडूंनी रोमहर्षक खेळ करीत चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

सायना पाच वेळा गेम आणि सामना जिंकण्याच्या स्थितीत आली असताना सिंधूने मुसंडी मारून संघर्ष केला. अखेर लढत २६-२५ अशी काठावर आली तोच सायनाने मारलेला शॉट सिंधूकडून परत न येता नेटमध्ये अडकताच सायनाचा सनसनाटी विजय साकार झाला.