2025 Yezdi Adventure: येज्दी अॅडव्हेंचर नव्या अवतारात लॉन्च, नव्या बाईकमध्ये मिळतायेत खास फिचर्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 21:31 IST2025-06-04T21:28:37+5:302025-06-04T21:31:11+5:30
2025 Yezdi Adventure: क्लासिक लेजेंड्सने त्यांची बहुप्रतिक्षित मोटरसायकल नवीन येझदी अॅडव्हेंचर भारतीय बाजारात लॉन्च केली आहे.

क्लासिक लेजेंड्सने त्यांची बहुप्रतिक्षित मोटरसायकल, नवीन येझदी अॅडव्हेंचर, भारतीय बाजारात लाँच केली आहे. बाईकचा लूक नवीन करण्यासाठी तिच्या डिझाइनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.बाईकच्या पॉवरट्रेनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कंपनीने नवीन येझदी अॅडव्हेंचर २.१५ लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत लाँच केली आहे.
नव्या बाईकमध्ये एका बाजूला मल्टी-रिफ्लेक्टर हेडलाइट आणि दुसऱ्या बाजूला प्रोजेक्टर लाईट आहे. यामुळे अंधारात प्रकाश सुधारण्यास मदत होईल जी मागील बाईकमध्ये इतकी चांगली नव्हती.
बाईकमध्ये ट्विन एलईडी टेल लाईट्स देखील आहेत. याशिवाय, बाईकमध्ये नवीन रॅली-स्टाईल बीक, नवीन डेकल्स, तसेच नवीन टँक आणि ग्राफिक्स आहेत. नवीन बाईक सहा रंगांमध्ये उपलब्ध आहे.
बाईकमध्ये एलईडी लाईट्स, एलसीडी डिस्प्ले, अॅडजस्टेबल व्हॉयझर, ट्रॅक्शन कंट्रोल आणि तीन एबीएस मोड आहेत.
या बाईकमध्ये ३३४ सीसी, लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे २९.२० बीएचपी पॉवर आणि २९.६ एनएम पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. बाईकमध्ये इंजिन ६-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहेत